डिजिटल अरेस्टसाठी तोतया पोलिस अधिकाऱ्याचा VIDEO कॉल अन् युवकाची शक्कल…

मुंबईः आर्थिक फसवणूकीमधून डिजिटल अटक करण्याच्या हेतूने बनावट पोलिस अधिकाऱ्याने व्हिडीओ कॉल केला असता, युवकाने आपल्या श्वानालाच कॅमेऱ्यासमोर बसवले. संबंधित व्हिडिओ युवकाने इंस्टाग्रामला शेअर केला आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला तोतया पोलिस अधिकारी सांगतो की, ‘मी अंधेरी पूर्व पोलिस ठाण्यातून बोलत असून, युवकाला त्याचा चेहरा दाखवण्यास सांगतो. पण युवक चेहरा दाखवण्याची मागणी पूर्ण करण्याऐवजी थेट आपल्या श्वानाला कॅमेऱ्यासमोर बसवतो. “हे घ्या सर, आलो मी समोर”, असे तो उपहासात्मकपणे व्हिडीओ कॉलमध्ये सांगतो. यावेळी तो श्वानाला कॅमेऱ्याच्या अगदी जवळ नेतो. तोतया पोलिस अधिकारीही आश्चर्यचकित होतो. हसतो आणि कॅमेरा अँगल बदलत फोन कट करतो. ‘अरे हा पाहा मी. अर ठाणेदार दिसतोय का? अरे खोटी वर्दी,’ असं म्हणत युवक हसत राहतो. यावेळी चिडलेला आणि पकडले गेलो आहोत ही जाणीव झालेला तोतया पोलिस अधिकारी फोन बंद करतो. “मुंबई पोलिस असल्याचा बनाव, स्कॅम कॉल पकडला गेला,” अशी कॅप्शन त्याने व्हिडीओला दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Martina Gracious (@shinny_martina)

डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय?
डिजिटल अटक ही एका प्रकारची फसवणूक आहे. यामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी असल्याची बतावणी करून, खोट्या ऑनलाइन तपासाच्या किंवा अटकेच्या धमकीखाली पैसे देण्यास भाग पाडतात. भय आणि दहशतीची भावना निर्माण झाल्याने अनेकजण याला बळी पडतात. काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका जपानी व्यक्तीला मुंबई पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी 35.5 लाख रुपयांचा गंडा घातला होता. घोटाळेबाजाने त्याच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात गुंतल्याचा खोटा आरोप केला आणि त्याला “डिजिटल अरेस्ट” केली. आरोपींनी त्याला त्याला विविध माध्यमांद्वारे पैसे देण्यास भाग पाडले होते.

धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…

Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…

नवरदेवाने इन्स्टन्ट लोन कंपनीकडून पैसे घेतले पण एजंट्सनी पत्नीचे फोटो केले मॉर्फ अन्…

Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…

पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…

Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…

Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…

युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…

सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…

महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!