
अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्या बहिणीला अटक; प्रियकराला जिवंत जाळलं…
न्यूयॉर्क : बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी हिची बहिण आलिया हिला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीच्या बहिणीवर बॉयफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आलिया फाखरी हिने रागाच्या भरात न्यूयॉर्क क्विंसमधील एका दोन मजली गॅरेजला आग लावली. या गॅरेजमध्ये तिचा बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर होता. या आगीत तिचा बॉयफ्रेंड एडवर्ड जॅकब्स आणि एटिएन यांचा जळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे अभिनेत्री नरगिसची बहिण आलिया हिला या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
अभिनेत्रीची बहिण आलिया आणि जॅकेब अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते. जॅकेबच्या आईने त्यांच्या नात्याविषयी सांगितले की, दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण एक वर्षांआधीच दोघे वेगळे झाले. पण तरीही आलियाने जॅकेबचा पाठलाग करणं थांबवलं नाही. जॅकेब एका पॉपर्टवर काम करत होता. तो एका गॅरेजच्या ठिकाणी अपार्टमेंट बनवणार होता आणि तिथे ही आग लागली आणि दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ‘आम्हाला काही तरी जळण्याचा वास आला होता. बाहेर पाहिल्यानंतर शिड्यांवर असलेल्या सोफ्यांना आग लागली होती. आम्हाला बाहेर पडण्यासाठी त्यावर उड्या मारव्या लागल्या. त्या स्टारनेही माझ्याबरोबर उडी मारली. पण जॅकब्सला वाचवण्यासाठी ती पुन्हा आत आली होती.’
प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे…
बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात बनली IPS अधिकारी…
अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय…

