
पायलट युवतीच्या आत्महत्येबद्दल पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर…
मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली (वय २५) नावाच्या वैमानिक युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासानंतर युवतीच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांना तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सृष्टी ही गोरखपूरमधली (उत्तर प्रदेश) पहिली वैमानिक युवती होती, त्यामुळेच तिच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांची उपस्थिती होती, सृष्टी हिच्या अशा अकाली निधनाने गावकऱ्यांवरही शोककळा पसरल्याचे दिसून आले. युवतीचे काका विवेककुमार तुली यांनी त्यांच्या मित्रासोबत केलेल्या संवादातून ही माहिती समोर आली आहे. सृष्टी ही एका खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत होती. राजधानी दिल्लीतील एका प्रशिक्षण संस्थेत सृष्टी आणि तिचा मित्र आदित्य पंडित (वय २७) यांची दोन वर्षांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर, ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
पवई पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आदित्य पंडित याला कोर्टात हजर केले असता कोर्टामधून त्याला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सृष्टीने टोकाचा पाऊल का उचलला यामागे बॉयफ्रेंड च्या हात आहे का? या सर्व संदर्भात अधिक तपास पवई पोलीस करत आहेत. मात्र, एफआयआरमधील माहितीनुसार, सृष्टी आणि तिच्या प्रियकरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता.
आदित्य पंडित याने तिच्यासोबत भांडण करुन तिला मानसिकदृष्ट्या त्रास दिला. तो तिच्या बँक खात्यातून पैसेही काढून घ्यायचा. तर, नॉन व्हेज खाल्ल्यामुळेही तो तिच्यावर ओरडला होता, अशी माहिती तक्रारीतून काकांनी दिली आहे. गोरखपूर येथील सृष्टीचे काका हे गॅस एजन्सी चालवतात. त्यांनी या घटनेबाबत फिर्याद दिली असून, आदित्यकडून सृष्टीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न होत होता, तो तिच्याशी सातत्याने भांडण होता. आदित्य याच्या बहिणीच्या साखरपुडा कार्यक्रमास न गेल्यामुळे त्याने सृष्टीसोबत गेल्या 10 दिवसांपासून बोलणे बंद केले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.
धक्कादायक! मुंबईत पायलट युवतीने केली आत्महत्या; प्रियकर ताब्यात…
Video: भारतीय हवाई दलाचे एअरक्राफ्ट कोसळले, दोन पायलटचा मृत्यू…
हृदयद्रावक! दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या…
पोलिस अधिकाऱ्याच्या एकुलत्या एका मुलाची आत्महत्या; मी जीवनाचा आनंद घेतला आहे…
प्रेमीयुगलाची एकत्र आत्महत्या; युवतीच्या वडिलांनी उचलले मोठे पाऊल…
धक्कादायक! सोलापूरमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या…

