
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील लाच घेणारे पाच अधिकारी निलंबीत…
ठाणे : निवडणूक काळात निवडणूक यंत्रणाच्या विश्वासाला तडा जाणारे कृत्य समोर आले आहे. फूल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याकडून लाच मागणाऱ्या निवडणूक आयोगाच्या 5 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फूल विक्रेते असलेले बबन आमले हे अहमदनगरला शेतकऱ्यांना त्यांची रक्कम देण्यासाठी जात होते. त्याच दरम्यान निवडणूक आयोगाच्या दोन भरारी पथकाच्या प्रमुखांनी आमले यांच्या कारला कल्याण-मुरबाड मार्गावर तपासणीसाठी थांबवले. त्यांच्यासोबत उल्हासनगर महापालिकेतील कार्यरत असणारे अण्णासाहेब बोरुडे, पोलिस कॉन्स्टेबल विश्वनाथ ठाकूर आणि राजरत्म बुकटे यांचा समावेश होता.
भरारी पथकाने केलेल्या तपासणीत फूल विक्रेते आमले यांच्या बॅगेत मोठी रक्कम आढळली. ही रक्कम जप्त करण्याची धमकी या पथकाने दिली. मात्र, आमले यांनी ही रक्कम आपली असून त्याच्यासाठीचे कागदपत्रेही सादर केली. मात्र, भरारी पथकातील अधिकाऱ्याने या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये यासाठी 85 हजारांची मागणी केली. आमले यांनी ही रक्कम भरल्यानंतर त्यांना जाऊ दिले. त्यानंतर आमले ही पुढच्या दिवशी या प्रकाराची उल्हासनगरमध्ये पोलिस तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि त्याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपवला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अहवालाच्या आधारे संबंधित पाच कर्मचाऱ्यांना उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांनी निलंबित केले आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्याने 5 लाख रुपयांची लाच मागितली
एका गोणीत सापडला मृतदेह; मृतदेहाचे एकूण सात तुकडे…
संतापजनक! 2 वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणं घुसवलं अन् मारलं…
प्रेम प्रकरण! योगा टीचरला विवस्त्र करून जमिनीत पुरलं पण जिवंत बाहेर आली अन्…
भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या…

