बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी याला पोलिसांनी घेतलं ताब्यात…

मुंबई : बिग बॉस 17चा विजेता आणि प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी एका हुक्का पार्लरवर छापा टाकला. या छापेमारीत मुनव्वर फारुकीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुनव्वर फारुकीबरोबरच हुक्का पार्लरमधून आणखी 13 जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुनव्वरसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री फोर्ट परिसरात असलेल्या सबलन हुक्का बारवर छापा टाकला. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने घटनास्थळावरून 13 जणांना ताब्यात घेतले. यावेळी कॉमेडियन मुनव्वर फारुकी देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. हा जामीनपात्र गुन्हा असून पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुनव्वर फारुकी याला नोटीस बजावून सोडून दिले आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

फोर्ट परिसरातील या हुक्का पार्लरमध्ये हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी बारवर छापा टाकला. हुक्का पार्लरमध्ये सापडलेल्या वस्तूंची तपासणी करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकीसह 13 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलं चौकशीनंतर मुनव्वरला सोडण्यात आलं. त्यानंतर मुनव्वरनं एअरपोर्टवरील त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. “थकलोय, प्रवास करतोय”, असे शीर्षक त्याने त्या फोटोला दिले आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी फोर्ट येथील हुक्का पार्लरमध्ये 4,400 रुपये आणि 13,500 रुपयांचे महागडे 9 हुक्का पॉट जप्त केले आहेत. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘कुमकुम भाग्य’फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…

अभिनेत्रीने केली मैत्रिणीच्या घरी मोठी चोरी अन् गेली गोव्याला…

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने घेतली पोलिसांत धाव; कारण…

अभिनेत्री जया प्रदा पोलिसांसमोर अचानक राहिल्या हजर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!