
नाशिकमध्ये कोयता गँगचा दिवसा ढवळ्या सिनेस्टाईल धुमाकूळ…
नाशिक : नाशिक शहरातील सातपूरच्या श्रमिकनगरमध्ये आठ जणांच्या कोयता गँगने एका युवकाला कोयता व हॉकी स्टिकच्या साहाय्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कोयता गँगने परिसरात दहशत पसरवून नागरिकांना भयभीत केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
श्रमिकनगर येथील राधाकृष्णनगर मधील धात्रक चौकामध्ये अॅक्टिवावरून श्रमिकनगरच्या दिशेने जाणाऱ्या तीन युवकांवर पाठीमागून पाठलाग करत येणाऱ्या रिक्षमधील आठ जणांच्या टोळक्याने गुरुवारी (ता. ३) सायंकाळी सहाच्या सुमारास हल्ला केला. अॅक्टिवावरील दोन जणे जीव वाचवण्यासाठी पळून गेले. परंतु, अतुल खरे (रा. हिंदी शाळा, श्रमिकनगर) या युवकास आठ जणांनी सिनेस्टाईलमध्ये हॉकी स्टिक, स्टम्प व कोयत्याने डोके, पाठ व पायावर जबरी वार केले. वाचवायला येणाऱ्या नागरिकांना कोयते दाखवून घाबरवल्यामुळे कोणीही पुढे आले नाही.
अतुलच्या सोबत असलेल्या दोघांनी अतुलला जखमी अवस्थेत खाजगी दवाखान्यात नेले. परंतु, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिल्याने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. पूर्व वैमानस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, सातपूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी ज्या ठिकाणी गुन्हेगारी घडली त्या ठिकाणी गुन्हेगारांची थेठ धिंड काढली होती. मात्र, गुन्हेगार खुलेआम दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या आहेत. शिवाय, नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
नाशिक शहर पोलिसांनी काढली गावगुडांची धिंड…
नाशिकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने घेतला गळफास…
नाशिक हादरलं! चिमुकलीला विष पाजून पती-पत्नीची आत्महत्या; घरात…
महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार…
Video: नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना महिलेने शिकवला चांगलाच धडा…

