
वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. आंदेकरांनी हत्या ही पुर्वनियोजित कट असल्याची माहिती पुढे आली आहे. आरोपी विवेक कदम आणि दीपक तोरमकर यांनी नाना पेठ परिसराची पाहणी केली होती. दोघांनी वनराज आंदेकर यांच्यावर पाळत ठेवली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात विवेक कदम आणि दीपक तोरमकर यांना अटक करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाडच्या विरुद्ध यापूर्वी मोक्का कारवाई करण्यात आली होती. सोमनाथ गायकवाड याचा साथीदार असलेला निखिल आखाडे याचा आंदेकर टोळीने आधी खून केला होता. निखिल आखाडे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गायकवाडने जमवाजमव केली. याच काळत वनराज आंदेकरांचे आणि त्यांची बहीण संजीवनी कोमकर, प्रकाश कोमकर, गणेश कोमकर यांच्याशी वाद झाले होते. कौटुंबिक वादातून कोमकरनी सोमनाथ गायकवाड याच्याशी संपर्क साधला. गायकवाड, कोमकर, प्रसाद बेल्हेकर, अनिकेत दूधभाते यांनी आंदेकर यांचा खून करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.
सोमनाथ गायकवाड मोक्का कारवाईनंतर जामीनीवर कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर त्याने वनराज आंदेकरांना संपवण्याची योजना आखली. पाळत ठेवणारे आरोपी विवेक कदम आणि दीपक तोरमकर आधीपासून गायकवाडसाठी काम करत होते. आंदेकर यांची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी नियोजन केले. १ सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम हे डोके तालीम परिसरातील उदयकांत आंदेकर चौकात गप्पा मारत होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अचानक ६ – ७ दुचाकीवरून आलेल्या काहींनी पिस्तुलातून गोळीबार केला, त्याचबरोबर कोयत्याने वार केले. त्यांची हत्या करण्यापूर्वी आरोपी तोरमकर आणि कदम यांनी नाना पेठ परिसराची पाहणी केली. दोघांनी आंदेकरांवर पाळत ठेवली होती.
वनराज आंदेकर कार्यकर्त्यांबरोबर असल्याची माहिती आरोपींना होती. आरोपी तोरमकर आणि कदम यांनी चौकात एका ठिकाणी पाणीपुरी विक्रेत्याकडे पाणीपुरी खाल्ली. पाळत ठेवून असताना आंदेकर आणि त्यांचा भाऊ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर कोणीही कार्यकर्ते नव्हते. याचा फायदा घेत तोरमकर आणि कदम यांनी संधी साधली. सेव्हन लव्हज चौकात थांबलेल्या साथीदारांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळात तिथे आलेल्या आरोपींनी आंदेकर यांच्यावर आरोपींनी हल्ला केला, गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…
वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…
वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…
वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…
वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…
सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…
वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…
पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…
पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…
पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…
पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…
पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….
Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

