Video: नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना महिलेने शिकवला चांगलाच धडा…

नाशिक : मुलीची छेड काढल्याने आईने टवाळखोरांना चोप दिल्याची घटना नाशिकच्या सिडको परिसरात घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या महिलेच्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवशक्ती नगर परिसरात टवाळखोर रस्त्यावर उभे राहून महिला मुलीची छेड काढत होते. एका युवतीची बुधवारी (ता. २८) छेड काढल्याने तिने आपल्या आईला याबाबतची माहिती दिली. त्या महिलेने टवाळखोर उभे असतात तिथे जाऊन ओळख पटविण्यासाठी मुलाला बोलावून घेतले. त्यानंतर महिलेने टवाळखोराला जाब विचारल्याने त्याने हुज्जत घालण्यास सुरवात केली. यानंतर महिलेचा पारा चढला. महिलेने टवाळखोरांना चोप देण्यास सुरुवात केली. बाजूनेच भंगार विक्रेत्याची हातगाडी जात असताना त्यावरची खर्ची उचलून छेड काढणार्‍यांना धडा शिकवला.

दरम्यान, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. स्थानिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर चार संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहे. महिलेने मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना धडा शिकवल्याने महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…

नाशिक हादरलं! एकाच विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह…

नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…

महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार…

धक्कादायक! नाशिकमध्ये चिमुकल्याचे अपहरण अन् अत्याचार करून हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!