धक्कादायक! प्रेम एकावर; सात फेरे दुसऱ्यासोबत अन् लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी…

अहमदाबाद (गुजरात) : प्रेम एकावर आणि सात फेरे दुसऱ्यासोबत घेतल्यानंतर लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाविक चुनारा (वय २४, रा. वाटवा) असे मृताचे नाव आहे. भाविकच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

भाविक चुनारा याचे 10 डिसेंबर रोजी पायल (वय २३) हिच्यासोबत लग्न झाले होते. पायल हिचे मामाचा मुलगा कल्पेश याच्यासोबत प्रेमसंबंध होतं. त्यामुळे ती या लग्नामुळे खूश नव्हती. तिने पतीला मारायचं ठरवलं आणि प्रियकराच्या मदतीने कट रचला. भाविकचे वडील कन्हैया लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविक लग्नानंतर तीन दिवसांनी पायलला आणायला स्कूटरने तिच्या घरी गेला होता. पण, दुसऱ्या दिवशी पायलच्या वडिलांचा फोन आला की भाविक अजून आला नाही. त्यानंतर कन्हैयालाल यांनी मुलाचा शोध सुरू केला. भाविकची स्कूटर कोटेश्वर महादेव मंदिराजवळ आढळली. इनोव्हा कारमध्ये आलेल्या तिघांनी भाविकला हॉस्पिटलला नेण्याच्या बहाण्याने जबरदस्ती गाडीत बसवले आणि तिथून घेऊन गेल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्यानंतर कन्हैयालाल यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केल्यावर त्यांना भाविकची पत्नी पायल हिच्यावर शंका आली. तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने तिच्या साथीदारांची नावं सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर कल्पेश व त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. सोमवारी या आरोपींची चौकशी करून त्यांना न्यायालयात हजर केले आणि तुरुंगात रवानगी केली.

आरोपी पायल हिने तपासादरम्यान सांगितले की, ‘कल्पेश सोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीय त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हते आणि त्यांनी तिचं लग्न जबरदस्ती भाविकशी लावले. भाविक सासरी घेऊन जायलाला येतो आहे हे समजल्यावर पायलने कल्पेशला सांगितलं आणि हत्येचा कट रचला. कल्पेश ठरल्यानुसार कोटेश्वर महादेव मंदिराजवळ इनोव्हा कारमध्ये भाविकची वाट पाहात होता. भाविक आल्यावर त्याला थांबवले त्याचं अपहरण केले. त्यानंतर गळा आवळून त्याचा खून केला आणि मृतदेह नर्मदा कॅनलमध्ये फेकून दिला.’

नवरीचा बेडवर सापडला प्रियकराचा मोबाईल; ओपन करताच बसला धक्का…

लग्नसमारंभावेळी गोळीबार; थेट नवरीच्या डोक्यात घुसली गोळी…

हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…

नवरी लग्नानंतर एकच रात्र नवरदेवा सोबत राहायची अन् हळूच…

हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!