
पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…
पुणे : आईच्या प्रियकराने मुलीचा विनयभंग करत तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीने (वय १४) आधी घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला होता. पण, आईने तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मुलीने घडलेला प्रकार शाळेतील शिक्षिकेला सांगितला आणि आरोपीचे बिंग फुटले. रावेत पोलिसांनी पंकज धोत्रे या आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
रक्षाबंधनाच्या दिवशी पीडित मुलगी घरी एकटीच होती. आई कामावर तर भाऊ शाळेत गेला होता. यावेळी आरोपीने पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले. मात्र मुलीने आरडा ओरड करताच आरोपीने तिला सोडून दिले. वर्षभरापूर्वीही आरोपीने या मुलीसोबत असेच कृत्य केले होते. मात्र घडलेला प्रकार आईला सांगितला असता तुला भास झाला असेल असे म्हणत आईने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
दरम्यान, पीडित मुलीचे आई आणि वडील गेले अनेक वर्ष सोबत राहत नाहीत. आईची आरोपी पंकज धोत्रे याच्या सोबत ओळख झाली होती. धोत्रे नेहमी आपल्या घरी येतो, असे या पीडित मुलीने फिर्यादीमध्ये म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पुणे जिल्हा हादरला! बापानेच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…
प्रियकरसाठी मातेने केली स्वतःच्या मुलीची गळा चिरून हत्या…
मुंबईत मैत्रीच्या ओळखीचा गैरफायदा! सामूहिक बलात्कार…
शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…
पुण्यातील स्कूल व्हॅन चालकाचा विद्यार्थिनीला मेसेज; तू मला आवडतेस…

