
अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…
चेन्नई : साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता जयसुर्या आणि मुकेश यांच्याविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्रीकडून दोघांवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे.
अभिनेत्री मीनू मुनीर हिने चार अभिनेते आणि इतर टेक्निशियन्सवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. अभिनेता मनियन पिल्ला राजू, जयसूर्या आणि अडवेला बाबू यांची नावे होती. यांच्यातील अभिनेता जयसूर्या आणि मुकेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्रीने प्रसिद्ध मल्याळम अभिनेते आणि सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार एम. मुकेश यांच्याविरोधातही आवाज उठवला. अभिनेता मुकेशवर अभिनेत्री मीनू मुनीर हिने लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. अनेक वर्ष त्यानं तिचा लैंगिक छळ केल्याचे तिने सांगितले. केरळ पोलिसांनी अभिनेता जयसूर्या विरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेत्री मीनू मुनीर हिने एका मुलाखतीत सांगितले, ‘चित्रपटाच्या सेटवर मी टॉयलेटला गेले होते. बाहेर आले तेव्हा जयसुर्याने मला मागून धरले आणि माझ्या परवानगी शिवाय मला किस केला. मी त्याला धक्का दिला. मी घाबरले आणि तिथून पळून गेले. अभिनेत्री मीनू मुनीर हिच्याबरोबरच मल्याळम इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी लैंगिक छळावर भाष्य केले आहे. त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक छळाविरोधात आवाज उठवला आहे. दरम्यान या प्रकरणात SIT स्थापन करण्यात आली. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत सुरू असलेल्या लैंगिक छळाची या SIT मार्फत योग्य चौकशी करण्यात येणार आहे.
अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…
प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक…
अभिनेत्रीने केली मैत्रिणीच्या घरी मोठी चोरी अन् गेली गोव्याला…
पुणे शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल…
प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने घेतली पोलिसांत धाव; कारण…

