
ऑनर किलिंग! अमितच्या ओरड्याचा हृदय पिळवटून टाकणारा आवाज; पाहा Video…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंगच्या घटनेने हादरले आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या वडिलांनी आणि भावाने युवकाची हत्या केली आहे. अमित साळुंखे (वय २२) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
अमित याने आपली बालपणीची मैत्रिणी विद्या किर्तीशाही हिच्यासोबत एक महिन्यापूर्वी पळून जाऊन लग्न केले होते. मात्र मुलीच्या वडिलांनी आणि भावाने अमितवर 14 जुलै रोजी चाकू आणि तलवारीने हल्ला केला. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.
अमितवर 14 जुलै रोजी हल्ला करण्यात आला होता. अमित पबजी खेळत असतांना मित्रांनी त्याला बाहेर बोलावले. बाहेर आल्यावर विद्याच्या चुलत भावांनी अमितवर चाकू तलवारीने हल्ला केला आणि अमितचा बळी गेला. पबजी खेळतच तो बाहेर पडला. त्याच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्याने केलेली आरडाओरड त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली आहे. अंगावर शहारे आणणारा अमितच्या आवाजाचा व्हिडीओ समोर आला आहे.
दरम्यान, विद्या आणि अमित दोघेही इंदिरानगर मध्येच लहानाचे मोठे झाले. बालपणीचे हे मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाऊन पुण्यात विधिवत लग्न केले. अमितच्या घरच्यांचा पाठिंबा मिळाल्याने ते परत आले. 13 जूनला त्यांनी लग्न केले आणि लग्नाचा एक महिना झाला असतानाच 14 जुलै रोजी अमित वर भर चौकात हल्ला झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अमितचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला आहे.
पोलिसकाका Video News: २७ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती; साडूने केला खून…
प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह अन् पुढे…
सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…
सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…
ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर हल्ला; गुन्हा दाखल…

