
दिराने केले विधवा वहिनीसोबत लग्न अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश): विधवा वहिनीसोबत लग्न केल्याच्या रागातून दोन भावांनीच भावाचा खून केल्याची घटना बागपत मध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.
बागपतचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एनपी सिंह यांनी सांगितले की, एका व्यक्तीला शुक्रवारी रात्री गोळी मारण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या घटनेमध्ये यशवीर (वय 32) याचा मृत्यू झाला होता. तपासादरम्यान यशवीरची हत्या त्याच्या मोठ्या भावांनी केल्याची माहिती पुढे आली. दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये राहणारे ईश्वर यांना सुखवीर, ओमवीर, उदयवीर आणि यशवीर अशी चार मुले आहेत. ईश्वर यांचा मुलगा सुखवीरचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्यानंतर त्याची पत्नी रितूने त्याचा लहान भाऊ यशवीरसोबत लग्न केले. भावाने वहिनीसोबत लग्न केल्याचे इतर दोन भावांना खटकले. दोघांना हे लग्न पटले नाही, त्यामुळे कुटुंबात वारंवार भांडणे होत होती. याच वादातून दोन भावांनी तिसऱ्या भावाचा खून केला.
यशवीर याने त्याच्या भावाच्या मृत्यूनंतर वहिनीसोबत लग्न केले. यशवीर हा दिल्लीत बस चालक म्हणून कार्यरत होता. यशवीर शुक्रवारी रात्री ड्युटी संपवून घरी परतला. यावेळी मद्यधुंद अवस्थेत ओमवीर आणि उदयवीर या दोघांनी यशवीरसोबत वाद घातला. यानंतर ओमवीर आणि उदयवीरने यशवीरची गोळी मारुन हत्या केली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन यशवीरचा मृतदेह ताब्यात घेतला. मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
धक्कादायक! छोटा भाऊ, वहिनी अन् चिमुकल्याची सपासप वार करत केली हत्या….
दीर आणि वहिनी झाडाखाली थांबले-थांबले अन् पुढे…
दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…
वहिनी पहाटेच्या सुमारास भांडी घासत असताना दिर जवळ गेला अन्…
हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…
नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…

