वहिनी पहाटेच्या सुमारास भांडी घासत असताना दिर जवळ गेला अन्…

रांची (झारखंड): वहिनीने प्रेयसीसोबत लग्न करु नकोस, असा सल्ला दिल्यामुळे संतापलेल्या दिराने भावजयीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गिरीडीह जिल्ह्यातील डूमरडीहा या गावात घडली आहे. रेहाना खातून (वय 32) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

डूमरडीहाचे ग्रामस्थ सुद्दीन अन्सारी यांचा मोठा मुलगा शमशेर अन्सारी याची रेहाना ही पत्नी होती. पहाटे चारच्या सुमारास रेहाना घरामागे भांडी घासत होती. यावेळी दिराने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी सुद्दीन अन्सारी यांना ताब्यात घेऊन चौकशीदरम्यान सांगितले, ‘रेहाना खातून ही मोठी सून होती. तिचा पती शमशेर हा गवंडी आहे. धाकटा मुलगा अंशुर गावातील एका मुलीच्या प्रेमात पडला होता. त्या मुलीशी लग्न करायची त्याची इच्छा होती. या लग्नाला रेहानाचा विरोध होता. त्यामुळे दीर आणि भावजय यांच्यात महिनाभर सतत खटके उडत होते. त्यामुळेच अंशुरने इतर आरोपींना हाताशी धरुन तिची निर्घृण हत्या केली.’

या घटनेची माहिती मिळताच घोडथांबा येथील पोलिस प्रभारी विभूती देव आणि धनवार येथील पोलिस प्रभारी नंदू कुमार पाल घटनास्थळी पोहोचले. रेहानाचा मृतदेह, तिच्यावर वार करण्यासाठी वापरलेलं धारदार शस्त्र ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…

वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…

नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…

वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…

वहिनी घरात एकटीच असल्याचे पाहून दीर घुसला घरात अन्…

वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!