
लहान मुलांच्या चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; आठ नवजात बाळांची सुटका…
नवी दिल्ली : केंद्रीय तपास संस्था सीबीआयने राजधानीत लहान मुलांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, आठ नवजात बाळांची सुटका केली आहे. सीबीआयने इतर राज्यांमध्येही पथके रवाना केली आहेत.
सीबीआयने केलेल्या कारवाईत चार आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सीबीआयकडून याप्रकरणी औपचारिक खुलास करण्यात आला आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे. नवजात बाळांसह १० वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांची चोरी आणि त्या प्रकरणी सीबीआयला माहिती मिळाली आहे. यानंतर सीबीआयकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली होती.
लहान मुलांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणी सीबीआयने दिल्ली एनसीआरसह अनेक राज्यात शोध मोहिम सुरू केली आहे. गेल्या काही काळापासून सीबीआय़ला मुलांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी आणि काही संस्थांच्या संबंधित कार्यालयांवर, ठिकाणांवर छापे टाकले होते. शोध मोहिमेत सीबीआयच्या हाती महत्त्वाची कागदपत्रेही सापडली आहेत.
दिल्लीच्या केशवपुरममधून दोन मुलांना सोडवण्यात आले आहे. दिल्लीतील एका रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करणारा मुलगा आणि इंदु नावाच्या महिलेसह काही आरोपी ताब्यात घेतले आहेत. रुग्णालयांमध्ये नवजात बाळांची खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत द्वारका, नॉर्थ वेस्ट जिल्हा, रोहिणी परिसरासह इतर ठिकाणी तपास सुरू आहे.
पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…
पुणे शहरात खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या वृध्द महिलेची केली सुटका…
महाराष्ट्र ATS चे प्रमुख सदानंद दाते यांची NIAच्या महासंचालकपदी नियुक्ती…
लोणीकंद परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश…
प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…

