प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास परिसरात बंगल्यात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारून 5 जणांना अटक केली. परदेशी युवतीसह दिल्लीच्या 2 युवतींची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजेंद्र राजपूत आणि प्रवीण बालाजी कुरकुटे यांच्यासह अन्य तिघांना यात अटक करण्यात आली. कॅसिनोत नोकारीच्या बहाण्याने उझबेकिस्तानची 28 वर्षीय युवती देशाच्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटमध्ये सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील टॉप महिला दलाल कल्याणीच्या माध्यमातून ती गेल्या 8 दिवसांपासून शहरात देहविक्री करत होती.

प्राध्यापक सुनील रामचंद्र तांबट (वय ५४, रा. एन-७) याने स्वतःच्या ट्यूशनच्या तळमजल्यातच वेश्याव्यवसाय सुरू केल्याचे सिडको पोलिसांनी उघडकीस आणले आहे. त्याचा साथीदार संदीप मोहन पवार (३२, रा. जाधववाडी) याच्यासह अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत बीड बायपासवर तुषारच्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटची माहिती पोलिसांना समजली होती. उपायुक्त नवनीत काँवत यांनी कारवाईच्या सूचना केल्या. निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता बीड बायपासवरील एका उच्चभ्रू वसाहतीतील बंगल्यावर डमी ग्राहक पाठवला. वेश्याव्यवसायाची खात्री होताच धाड टाकली. त्यानंतर तुषार, प्रवीणसह अन्य पाच जणांना अटक केल्याचे काँवत यांनी सांगितले.

भारतीय मुलींची ४ हजार तर विदेशी मुलींसाठी ८ ते १० हजार रुपयांमध्ये देहविक्री चालत होती. तुषारच्या मोबाइलमध्ये शहरातील अनेक नामवंत व्यावसायिक, राजकीय पुढाऱ्यांचे नाव आढळल्याचेही पोलिसांनी सांगितले. तोच सर्व स्थानिक व्यवहार सांभाळत होता. तुषार, प्रवीणला शेवटचे १७ ऑक्टोबर २०२० रोजी बायपासवर अटक झाली होती. त्याच्यावर ६ तर प्रवीणवर ३ गुन्हे दाखल आहेत. मात्र, शहरातील सेक्स रॅकेटमध्ये पहिल्यांदाच पुण्याच्या कल्याणीचे नाव समोर आले. कारागृहात राहूनही कल्याणी देशभरात सेक्स रॅकेट चालवण्यासाठी कुख्यात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…

पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!