Video: लोणावळा येथे अश्लिल चित्रफीत तयार करणा-या टोळीवर कारवाई; पाहा नावे…

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा ग्रामीण पोलिसांची छुप्या अश्लिल चित्रफीत तयार करणा-या टोळीवर धडाकेबाज कारवाई केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे ग्रामीण पोलिस जिल्हयाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्हयातील अवैध धंदयांवर परीणामकारक कारवाई करून त्यांचे समुळ उच्चाटन व निर्दालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्रामध्ये चोरून / छुप्यारितीने अवैध व्यवसाय करणा-यांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडुन पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण व सत्यसाई कार्तीक, सहा. पोलिस अधीक्षक, तथा उप विभागीय पोलिस अधिकारी, लोणावळा विभाग, लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये छुप्यारितीने अवैध व्यवसाय करणा-या अवैध व्यवसायीकांवर परीणामकारक कारवाई करण्यात येत आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना ३०/०३/२०२४ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही व्यक्ती व महिला हे स्वतःचे आर्थिक फायदया करीता मौजे पाटण गावचे हददीत बंगला भाडोत्री घेवुन त्यामध्ये पुरुष व स्त्रीया संभोग करताना / नग्न अशिल चित्रीकरण करतात व सदरचे अश्लिल व्हिडीयोज विविध अवैध व अनधिकृतपणे बेबसाईट्सवर तसेच मोबाईल अॅप्लीकेशनवर अपलोड करून अश्लिल मजकूर ऑनलाईन प्रसारीत करतात. तसेच सदर अश्लिल व्हिडीओ पाहण्यासाठी सबस्क्रिश्न चार्जेस घेवुन गैर मार्गाने लाखो रूपायांची कमाई करतात व सदरचे अशिल व्हिडीओज Instagram, Twitter, Whatsapp इत्यादी सोशल मिडीया साईट्स व इंस्टट मेसेंजर यावरून प्रसारीत करतात व त्यातून स्वतःचा अर्थिक फायदा
करून घेतात.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, रमेश चोपडे, अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण व सत्यसाई कार्तीक, सहा. पोलिस अधीक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी, लोणावळा विभाग, लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पो. स. ई. भारत भोसले, पो.स. ई. सागर अरगडे, सहा. पोलिस उप निरीक्षक अजय दरेकर, सहा. पोलिस उप निरीक्षक महेंद्र वाळुंजकर, सहा पोलिस उप निरीक्षक बनसोडे, पो. हवा. दुर्गा जाधव, पो. हवा. भोईर, म. पो. हवा. घुगे, म.पो. ना. कोहीनकर, पो.कॉ. धनवे, पो. कॉ. सुरज गायकवाड यांचे पथकाने नमुद प्राप्त बातमीचे ठिकाणी २९/०३/२०२४ रोजी १७.०० वाजता छापा घातला असता मौजे पाटण गावचे हद्दीमध्ये आर्णव व्हिला, ता. मावळ, जि. पुणे येथे १३ पुरुष व ५ महिला हे भारत देशामध्ये अश्लिल व नग्न चित्रीकरणास तसेच प्रसारणास बंदी असल्याचे माहिती असताना देखील स्वतःचे आर्थिक फायदया करण्याचे उद्देशाने सर्वांनी संगणमत करून सोबतच्या दोन कॅमेरां व साधाने किं. रूपये ६७२६२०/- असा विविध अवैध वेबसाईट्स व मोबाईल अॅप्लीकेशनवर अपलोड करून प्रसारीत व प्रचारीत करण्याची व्यवस्था करून स्वतः नमुद पुरुष व स्वतः स्त्रीयां संभोग करतानाचे तसेच अश्लिल, नग्न व बिभीस्त चित्रीकरण करून वेगवेगळया अश्लिल, नग्न व बिभीस्त चित्रफिती तयार करत असताना मिळुन आले.

मळवली येथील तीन स्थानिक आरोपी यांनी स्वतःचे आर्थिक फायदया करीता ते भाडोत्री चालवत असलेला आर्णव व्हिला हा नमुदचे पुरुष व स्त्रीया यांचे कोणत्याही प्रकारची ओळखपत्रे न घेता आर्णव व्हिलामध्ये स्वतः पुरूष व सोबतच्या महिलांचे संभोग करतानाचे तसेच अश्लिल व नग्न चित्रीकरण करून वेगवेगळया अश्लिल, नग्न व बिभीस्त चित्रफिती तयार करत असल्याचे माहिती असताना देखील त्याबाबत पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता नमुदचा बंगला अश्लिल, नग्न व बिभीस्त व्हिडीयो तयार करण्याकरीता ३००००/- हजार रूपयांना ठरवुन २००००/- रूपये अॅडव्हान्स रक्कम घेवुन भाडोत्री दिला असल्याचे आढळून आल्याने नमुद इसमांचे विरूद्ध पो. स. ई. भारत भोसले, लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असुन ती गु.र.नं. ११४ / २०२४, भा.द.वि. का. क. २९२, २९३, ३४, माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७, ६७ (अ), स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपन अधिनियम १९८६ कायदा कलम ३, ४, ६,७ प्रमाणे दाखल करण्यात आली असुन नमुद गुन्हयाचा पुढील अधिक तपास वरीष्ठांचे आदेशान्वये पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ हे करत आहेत.

सदर कारवाई मार्गदर्शक अधिकारी
१) पंकज देशमुख साहेब, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण
२) रमेश चोपडे, अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण
३) सत्यसाई कार्तिक, सहा. पोलिस अधीक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी, लोणावळा विभाग, लोणावळा
कारवाईत सहभाग घेणारे अधिकारी व अंमलदार
१) किशोर धुमाळ, पोलिस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन
२) भारत भोसले, पो. स. ई. लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन
३) सागर अरगडे, पो. स. ई. लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन
४) अजय दरेकर, सहा. पोलिस उप निरीक्षक, लोणावळा ग्रामीण पो.स्टे.
५) महेंद्र वाळुंजकर, सहा. पोलिस उप निरीक्षक, लोणावळा ग्रामीण पो.स्टे.
६) युवराज बनसोडे, सहा. पोलिस उप निरीक्षक, लोणावळा ग्रामीण पो.स्टे.
७) बाळकृष्ण भोईर, पोलिस हवालदार, लोणावळा ग्रामीण पो.स्टे.
८) दुर्गा जाधव, पो. हवा. लोणावळा ग्रामीण पो.स्टे.
९) पुष्पा घुगे, पो. हवा. लोणावळा ग्रामीण पो.स्टे.
१०) रूपाली कोहीनकर, म. पो. ना. कोहीनकर लोणावळा ग्रा पो.स्टे.
११) सागर धनवे, पोलिस अंमलदार, लोणावळा ग्रामीण पो.स्टे.
१२) सुरज गायकवाड, पोलिस अंमलदार लोणावळा ग्रामीण पो.स्टे.

अश्लिल चित्रफित तयार करणारे आरोपी व महिला आरोपीची नावे पुढीलप्रमाणे…
१) विष्णु मुन्नासाहब साओ वय ३० वर्षे, रा. १६ / ताराचंद बॅनर्जीरोड, कामरहटी, नॉर्थ २४, परगना, कोलकत्ता,
२) जावेद हबीबुल्ला खान वय ३५ वर्षे, रा. आहरा उमरी, पोस्ट मुंडेखा, जि. बस्ती, उत्तरप्रदेश,
३) बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास वय – २९ वर्षे, रा. महाकाली कॉलनी, चंद्रपुर,
४) समीर मेहताब आलम वय २६ वर्षे, रा. अमरोहा, राईड मॉक्सी, मस्जीद जवळ, उत्तरप्रदेश,
५) अनुप मिथीलेश चौबे वय – २९ वर्षे, रा. रूम नं २, काशीबाईचाळ, इव्हर स्टॅण्ड, कांदिवली ईस्ट, मुंबई,
६) रामकुमार श्रीभगवान यादव वय २१ वर्षे, रा. रोनक सिटी, शाम कॉलनी, हरियाणा,
७) राहुल सुरेश नेवरेकर वय – ३८ वर्षे, रा. रूम नं १०, मोहनचाळ, नितीन कंपनी समोर, संभाजीनगर, वागळे इस्टेट, ठाणे,
८) अनिकेत पवन शर्मा वय- १९ वर्षे, व्यव मेकअप आर्टीस्ट, रा. रूद्राक्ष रेसिडेन्सी, पलसाना, सुरत, राज्य गुजरात,
९) वंशज सचीन वर्मा वय २१ वर्षे, रा. टी. एच. डी. सी. कॉलनी, डेहराखास, डेहराडुन
१०) मनीष हिरामण चौधरी वय २० वर्षे, रा. रोनक इराभाई, शास्त्रीनगर, हरीयाणा व ५ महिला आरोपी अश्लिल चित्रफित चित्रीकरणाकरीता बंगला भाडोत्री देणा-या आरोपींची नांवे
१) सुखदेव चांगदेव जाधव वय – ५२ वर्षे, रा. मळवली, ता. मावळ, जि. पुणे,
२) आकेश गौतम शिंदे वय ३२ वर्षे, रा. मळवली, ता. मावळ, जि. पुणे
३) सनी विलास शेडगे वय ३५ वर्षे, रा. मळवली, ता. मावळ, जि. पुणे

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एकाला पाठलाग करून पकडले अन्…

लोणावळा पोलिसांनी कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा केला जप्त…

लोणावळा येथे सत्यसाई कार्तिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच…

लोणावळा ग्रामीण भागातील घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड…

लोणावळा परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!