Video: वाहनचालकाला हृदयविकाराचा झटका; आठ जणांना चिरडले अन्…

जयपूर (राजस्थान) : एका वाहन चालकाला मोटार चालवत असानाना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि आठ जणांना चिरडले. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

राजस्थानमधील नागौरमधील देगना येथे विश्वकर्मा जयंतीच्या यात्रेदरम्यान हा अपघात झाला आहे. यात्रेत निघालेल्या बोलेरो मोटारीच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि मोटारीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच या वाहनाने आठ जणांना धडक दिली. सर्व जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. उर्वरित सहा जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वाहन आणि वाहन चालक दोघेही यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले होते. मोटारीपुढे नागरिक चालत असताना वाहन पाठीमागून संथ गतीने जात होते. अचानक गाडीचा ॲक्सिलेटर जोरात दाबले गेल्यामुळे वाहनाने पुढे चालणाऱ्यांना जोरात धडक देत पुढे जाऊन थांबले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहनात चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपास करत आहोत.’

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

Video: पिरंगुट घाटात भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडले…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

Video: अल्पवयीन मुलाने गुपचुप वडिलांची कार केली सुरू अन्…

Video: चिमुकलीच्या अंगावरून तीन वाहनं गेली अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!