समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागली अन्…

अमरावतीः समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ वर हा अपघात झाला. ट्रॅव्हल्सच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.

समृद्धी महामार्गावर आज (गुरुवार) पहाटेच्या पाचच्या सुमारास हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. महामार्ग सुरू झाल्यापसून अनेक छोटे मोठे अपघात झाला आहे. सर्वाधिक अपघात हे मध्यरात्री झाले आहे. अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलची बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात होताच चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या संदर्भात अधिक तपास सद्या तळेगाव दशासर पोलीस करत आहेत.

दरम्यान, समृद्धी महामार्गावर जवळपास एक हजाराच्यावर अपघात घडले आहेत. तर यामधील गंभीर अपघातामध्ये आतापर्यंत 368 जणांनी आपला जीव गमावला आहे. चालकला झोप येणे किंवा डुलकी लागणे यामुळे 183 अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. तर टायर फुटल्यामुळे 51 अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे या महामार्गावर आतापर्यंत 200 अपघात झाले असून त्यामध्ये जवळपास 41 जणांचा बळी गेला आहे.

साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…

समृद्धी महामार्गावर काळाचा घाला; युवक ठार, तिघे गंभीर…

समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…

समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

समृद्धी महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढाल तर तुरुंगात जाल…

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!