बंडगार्डन पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन बालकास घेतले ताब्यात अन्…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमध्ये जबरी चोरी करणारा अल्पवयीन बालकाला तपास पथकाने ताब्यात घेतले असून, 03 मोबाईल जप्त केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी पो उप निरी रविन्द्र गावडे व कर्मचारी पो ना सरवदे, श्री. पवार हे पेट्रोलिंग करत होते. पो शि ज्ञाना बडे व मनोज भोकरे गोपनीय बातमीदाराच्या बातमीवरून माहिती मिळाली कि जबरी चोरी करून मोबाईल विकणे कामी एक जण पाचबिल्डिंग ताडीवाला या ठिकाणी येणार आहे. सदर ठिकाणी सापळा रचून विधीसंघर्षित (रा. शिवनेरी नगर कोंढवा पुणे) बालकाला ताब्यात घेतले आहे. त्यास ताब्यात घेऊन सोबत असलेल्या मोबाईलबाबत विचारपूस असता सदर त्याने ते मोबाईल फोन मोटरसायकल वरून खेचून चोरी कल्याचे कबूल केले. त्यानुसार बंडगार्डन पो स्टे गु र नं 25/23 भा द वि कलम 392,34 या गुन्हयावतिरिक्त 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सदरची कारवाई अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील, साहाय्यक पोलिस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बंडगार्डन संदीपान पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पो. हवा सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, पो.शि ज्ञाना बडे, संजय वणवे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.

पुणे शहरात मोबाईल चोरी करणाऱ्यांना युनिट 4ने मुद्देमालासह घेतले ताब्यात…

Video: पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने वाचवले दोन जीव!

पुणे शहरात वाढदिवसाचा केक तलवार व कोयत्याने कापला अन् बड्डे बॉयसह…

फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणारा युनिट 4चे ताब्यात…

पुणे स्टेशनवर मोबाईल चोरणारा आला अन् सापळ्यात अडकला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!