
यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…
घाटंजी यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली तसेच पोलिस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) यांचे कडुन प्राप्त झालेल्या निर्देशाप्रमाणे लोकसभा निवडणूक – 2024 अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता जिल्हा स्तरावरील पोलिस आस्थापना मंडळाची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत आस्थापना मंडळाचे मान्यतेनुसार यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिले आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजाता बनसोड पोलिस स्टेशन बिटरगांव वरुन प्रभारी अधिकारी महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्ष यवतमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले पुसद पोलिस स्टेशन वरुन पोलिस ठाणे अवधूत वाडी यवतमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक माया चाटसे वणी पोलिस स्टेशन वरुन पोलिस ठाणे पांढरकवडा, पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) प्रविण लिंगाडे पोलिस स्टेशन पारवा वरुन पोलिस ठाणे कळंब, सहाय्यक पोलिस निरीक्षक धैर्यशिल घाडगे पोलिस स्टेशन अवधूत वाडी यवतमाळ वरुन पोलिस ठाणे आर्णी, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजु खारडे पोलिस ठाणे पुसद वरुन आर्थिक गुन्हे शाखा यवतमाळ, सहाय्यक पोलिस निरिक्षक विशाल नांदे पोलिस स्टेशन पुसद ग्रामीण वरुन पोलिस नियंत्रण कक्ष यवतमाळ व सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलींद पारडकर पोलिस स्टेशन बाभुळगांव वरुन डायल 112 यवतमाळ येथे बदली करण्यात आली आहे.
राज्यातील पोलिसांच्या सुट्या रद्द; पत्रकात म्हटले की…
पुणे जिल्ह्यातील ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या…
पुणे शहरातील १४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

