
बस आणि डंपरची समोरासमोर धडक; 13 जणांचा होरपळून मृत्यू…
भोपाळ (मध्य प्रदेश): गुना येथे बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण धडकेनंतर बस उलटली आणि आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. २५ जण बसची काच तोडून बाहेर आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. अपघातानंतर एकच खळबळ उडाली होती. मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला आहे.
अपघातग्रस्त बस बुधवारी (ता. २७) रात्री साडे आठच्या सुमारास आरोनला जाण्यासाठी निघाली होती. अर्ध्या तासाने ९ च्या सुमारास बजरंगगढ ठाण्याच्या अलिकडे ५ किमी अंतरावर वेगवान डंपरला बस धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बस उलटली. त्यानंतर आग भडकली. आग लागल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. प्रवाशांना काही समजण्याच्या आतच आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
सिकरवार ट्रॅव्हल्सची बस २०२२ च्या १७ फेब्रुवारीपासून अनफिट होती. तरीही ती चालवली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे या बसचा विमा नव्हता. या प्रकरणी आरटीओचा बेजबाबदारपणाही समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. बस चालकाने दारूचे सेवन केल्याची माहिती पुढे आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी या दुर्घटनेनंतर दु:ख व्यक्त केले असून, बस दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…
मुंबईमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; सात जणांचा होरपळून मृत्यू…
समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…
पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू….
ट्रकच्या धडकेनंतर कार पेटली; तिघे होरपळले, चौघांचा मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

