संतापजनक! दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न अन् संपवलेही…

छत्रपती संभाजीनगर: एकाने दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अतिप्रसंग करण्याला विरोध केल्याने या महिलेची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना लोणीखुर्द (ता. वैजापूर) येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अनुसयाबाई दामु जाधव (वय 75) अशी हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. लोणीखुर्द गावात एका महिलेचे डोके दगडावर अपटुन हत्या केल्याची घटना आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच शिउर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ तपासाचे चक्र फिरवित एका संशयीत आरोपीस अटक केली आहे. सुरवातीला हा सर्व चोरीचा प्रकार असल्याची चर्चा होती. मात्र, आरोपी हा चोरीसाठी नव्हे तर दारुच्या नशेत महिलेवर अतिप्रसंग करण्यासाठी आला होता. परंतु, तिने विरोध केल्याने महिलेची आरोपीने हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसाकडून वर्तवण्यात येत आहे. तर, संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे.

पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असतानाच मृत महिलेच्या घरासमोर राहणाऱ्या एका संशयीत आरोपीवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या घटनेत आरोपीचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.

संतापजनक! चुलत्याने सहा महिन्यांच्या चिमुकलीवर केला बलात्कार…

संतापजनक! शिक्षक असलेल्या बापानेच चिमुकलीवर केला अत्याचार…

संतापजनक! दिल्लीत 85 वर्षीय महिलेवर बलात्कार; ओठ कापले अन्…

संतापजनक! नवऱ्याने घेतली बायकोची ‘अग्निपरीक्षा’, प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली चटणी अन्…

शिक्षक बनवायचा अश्लील व्हिडिओ, पत्नीनेच केला भांडाफोड…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!