एअर होस्टेसच्या निर्घृण हत्येचा अखेर उलगडा, प्रेमसंबंध सहन न झाल्याने…

पुणे : पुणे विमानतळावरील विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम करत असलेल्या वर्षा तुरकर यांच्या निर्घृण हत्येचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध सहन न झाल्याने त्याच्या पत्नीनेच या महिलेच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. यासाठी तब्बल १३ लाख रूपयांची सुपारी देण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात महिलेसह चार आरोपींना अटक केली असून, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोंडराणी जंगल परिसरात १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास वर्षा धुर्नलाल तुरकर यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दवनीवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली. तिरोडा, खैरलांजी, वारासिवनी आणि बालाघाट ते गोंदिया या मार्गावरील तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चार दिवस तपासणी करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

तपासादरम्यान नितेश अग्रवाल याची पत्नी मोना अग्रवाल हिने पतीचे वर्षा तुरकर यांच्यासोबत असलेले प्रेमसंबंध संपविण्यासाठी हत्येचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले. यासाठी घराजवळ राहणाऱ्या कुणाल कुंभलकर याच्या मदतीने शाह रुख खान पठाण याच्याशी संपर्क साधण्यात आला. वर्षा तुरकर यांची हत्या करण्यासाठी तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात इमरान करीम शेख, शाह रुख खान फिरोज खान पठाण, कुणाल श्यामलाल कुंभलकर आणि मोना नितेश अग्रवाल या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

वर्षा तुरकर यांनी एव्हिएशन क्षेत्रातच काम करणाऱ्या समर सय्यद यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. कामाच्या निमित्ताने वर्षा या आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह पुण्याच्या धानोरी परिसरात राहत होत्या, तर त्यांचे पती समर हे इंदूर येथे कार्यरत होते. नितेश आणि वर्षा यांच्यातील प्रेमसंबंधांचा संशय नितेशची पत्नी मोना अग्रवाल हिला होता. यातूनच तिने वर्षा यांच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याशिवाय वर्षा यांनी नितेशला व्यवसायासाठी मोठी रक्कम दिल्याचा दावाही तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला.

नितेश आणि वर्षा जंगलात बसल्याचे मारेकऱ्यांना कसे कळाले…
वर्षा तूरकर यांच्या हत्या प्रकरणातील अत्यंत धक्कादायक प्रश्न म्हणजे हल्लेखोरांना वर्षा आणि नितेश यांचे जंगलातील अचूक लोकेशन कसे मिळाले, हे पोलिस तपासात समोर आले. नितेश ज्या कारमधून वर्षाला घेऊन फिरत होता, ती कार त्याची पत्नी मोना अग्रवाल हिच्या नावावर होती. या कारमध्ये टोयोटा आय-कनेक्ट ही जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली होती. मोनाने या जीपीएस प्रणालीचा आयडी-पासवर्ड हल्लेखोरांच्या मोबाईलमध्ये लॉगिन करून दिला होता. त्यामुळे नितेशच्या क्षणाक्षणाचे लोकेशन हल्लेखोर घरबसल्या पाहू शकत होते. नितेशची कार बोंडराणीच्या जंगलात थांबताच हल्लेखोरांनी तत्काळ जंगल गाठले अन् वर्षा यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात वर्षा यांचा मृत्यू झाला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने वर्षाच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. हा सारा कट मोना अग्रवाल हिने रचल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

दरम्यान, नितेश अग्रवाल यांच्याकडून हल्लेखोरांचे वर्णन मिळाले होते, त्यानुसार आपण त्यांच्या मागावर होतो. गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यात आपण आरोपींचा शोध घेतला. २५० ते ३०० सीसीटीव्ही फुटेज आपण तपासले. एका कॅमेरामध्ये त्यांची ओळख स्पष्ट झाल्यावर हल्लेखोर इम्रान याला आम्ही ताब्यात घेतले. इम्रानच्या चौकशीत शाहरूख पठाण नामक व्यक्तीने त्याला सुपारी दिल्याचे कळाले. त्या माहितीवरून आम्ही शाहरूखलाही ताब्यात घेतले. त्यानंतरच्या चौकशीत पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध सहन न झाल्याने पत्नीनेच या महिलेच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे, असे गोंदियाचे पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुण्यातील एअर हॉस्टेस संशयास्पद हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! मित्र संशयाच्या भोवऱ्यात…

पुणे शहरात काम करत असलेल्या एअर हॉस्टेसची गोंदियाजवळ हत्या…

एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या…

सांगली! पुण्यातून दिवाळीनिमित्त गावी गेलेल्या विवाहित प्रेयसीची हत्या…

पोलिस ठाण्याबाहेर प्रेयसीचा गोंधळ अन् पोलिस उपनिरीक्षकाचा आढळला मृतदेह…

कुटुंबात लग्नाची लगबग अन् नगरसेविकेच्या मुलाने घेतला गळफास…

पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!