महाराष्ट्राच्या हद्दीत घुसखोरी करून मासेमारी करणारी कर्नाटकची सुलतान नौका जप्त; सात खलाशांना अटक…

देवगड: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील ‘सुलतान’ या ट्रॉलर नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केली आहे. गेल्या सोमवारी (ता. २) मध्यरात्री देवगडजवळील भर समुद्रात ही नौका जप्त करण्यात आली असून, तांडेलसह सात खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुणगे किनाऱ्यापासून पाच ते सहा नॉटिकल मैल अंतरावर ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. गस्ती नौका दिसताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. ‘सुलतान’चा परवाना केवळ विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (ईईझेड) वैध असल्याची माहिती विभागाने दिली. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारीचा अधिकार नसतानाही नौका येथे मासेमारी करत होती.

बेकायदा ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणारी नौका मत्स्यव्यवसाय विभागाने काल मध्यरात्री सिंधुदुर्गात जप्त केलेली ही नौका कर्नाटकातल्या मलप्पे येथून आली होती, असे मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!