शिवाजीनगर पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी…

पुणे (संदिप कद्रे): शिवाजीनगर पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी केली आहे. उच्च शिक्षीत चोराने १७ मोबाईल चोरी करुन ते विक्री करण्यासाठी नामांकीत कंपनीचे मोबाईल बिलाचा दुरुपयोग करणाऱ्या चोरास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

फिर्यादी हे शिवाजीनगर जुना तोफखाना भागातील त्यांचे स्वतःचे फर्निचरचे दुकानात ०४/०१/२०२४ कामात व्यस्त असताना त्यांचा काउंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा असलेला मोबाईल चोरट्याने चोरी केल्याचे तक्रारी वरुन शिवाजीनगर पोलिस स्टेशनला गुन्हा रजि क्र.२०/२०२४ भादवि क. ३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

शिवाजीनगर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांचे नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलिस स्टेशन हद्दिमध्ये मोबाईल चोऱ्यांना प्रतिबंध करण्याकरीता व चोरीस गेलेले मोबाईल शोधण्याकरीता आदेश दिले होते. त्या अनुषंगाने चोरीला गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सपोनि बाजीराव नाईक व पोलिस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर भागात सापळा लावून एकास ताब्यात घेतले. कसुन चौकशी केली असता त्याने सदरचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे केलेल्या सखोल तपासामध्ये नामांकीत इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्री करणाऱ्या कंपनीचे मोबाईलच्या मुळ बिलाच्या पीडीएफ मध्ये चोरी केलेल्या मोबाईलचे डिटेल्स एडिट करुन त्याची पीडीएफ तयार करुन तो चोरी केलेला मोबाईल स्वतःचा असल्याचे भासवुन मोबाईल दुकानदारास बनावट बिलाची पीडीएफ व स्वतःच्या आधार कार्डच्या आधारे विक्री केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, सदर गुन्ह्यात भादवि कलम ४६५,४६८,४७१ प्रमाणे वाढ करण्यात आली व त्यास नमुद गुन्ह्यात १९/०४/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीने नमुद गुन्ह्यातील विक्री केलेला मोबाईल व इतर अशा प्रकारे चोरी केलेले एकुण १७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेले इतर मोबाईल संदर्भात तपास चालू आहे.

पुणे शहर पोलिसांकडून आवाहन करण्यात येते कि, मोबाईल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जुने वापरलेले मोबाईल खरेदी-विक्री करताना मोबाईल बिलाची पडताळणी करुन मगच व्यवहार करावे. सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, संदिपसिंह गिल्ल, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – १, वसंत कुंवर, सहा पोलिस आयुक्त, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांचे नेतृत्वाखाली सहा पोलिस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलिस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी केली.

शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींना सहा तासात अटक करून मुद्देमाल केला जप्त…

शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीकडून चार मोटारसायकली केल्या जप्त…

शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हेगारावार एमपीडीए अंतर्गत कारवाई…

Video: पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने वाचवले दोन जीव!

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!