हृदयद्रावक! IT इंजिनिअरच्या पत्नीची आठ पानांची चिठ्ठी; तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा…

पुणे: एका IT इंजिनिअरच्या पत्नीने मणक्याच्या आजाराला कंटाळून आपल्या सहा वर्षीय मुलासह १८व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

एकता बांगड (वय ३३) आणि माधव बांगड (वय ६) अशी मृत आई आणि मुलाची नावं आहेत. एकता यांनी आत्महत्येपूर्वी सात ते आठ पानांची सुसाईड नोट लिहिली होती. या नोटमध्ये त्यांनी पती मनोज यांच्याविषयी प्रेम व्यक्त करत आपल्या मृत्यूनंतर त्यांनी दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. एकता या गेल्या अनेक वर्षांपासून मणक्याच्या आजाराने त्रस्त होत्या. अनेक रुग्णालयांमध्ये उपचार करूनही त्यांच्या आजाराचं निदान होत नव्हतं. याच त्रासाचा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. दरम्यान, या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये १८ व्या मजल्यावरून उडी मारुन आई आणि सहा वर्षांच्या मुलाने जीवन संपवलं. शुक्रवारी, (ता ३०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. मृत महिलेचा पती हा येरवडा येथील एका आयटी कंपनीत कामाला आहे. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे असून गेल्या दोन वर्षांपासून या सोसायटीत राहत होते. पोलिसांना महिलेने जीवन संपवण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी सापडली आहे.

शेवटच्या नोटमध्ये, मृत महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या असून, तिच्या मृत्यूनंतर पतीने पुन्हा लग्न करावे आणि आपले आयुष्य नव्याने उभे करावे, असे नमूद केले आहे. तसेच, मुलाच्या भविष्याबद्दल आणि आपल्या अनुपस्थितीशी तो कसा जुळवून घेईल, याबद्दलच्या तिच्या चिंतेबाबतही तिने लिहले आहे. तिच्या मृत्यूनंतर मुलगा वारंवार आईबद्दल विचारत राहील, या भीतीपोटी तिने आपल्यासोबत आपल्या मुलालाही नेण्याचा निर्णय घेतल्याचे त्या चिठ्ठीत नमूद केल्याचे समजते. तसेच, लहान मूल सोबत असल्यास पतीला दुसरे लग्न करण्यास अडचण येऊ शकते, अशी भीतीही तिने व्यक्त केली होती. पोलीस या चिठ्ठीतील मजकुराची छाननी करत आहेत.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आई मुलाला १८ व्या मजल्यावर घेऊन जाताना दिसली होती. पोलिसांनी इमारतीमधील ‘सीसीटीव्ही’ फुटेजची पडताळणी केली असता, एकता या मुलगा माधव याला सोबत घेऊन लिफ्टने इमारतीच्या १८ व्या मजल्यावर जाताना दिसल्या. १८ व्या मजल्यावरील गॅलरीजवळ दोघांच्याही चपला आढळल्या महिती आहेत. त्यामुळे एकता यांनी मुलासह स्वतः उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! IT इंजिनिअरच्या पत्नीने मुलासह संपवलं जीवन, चिठ्ठी वाचून मन सुन्न…

हृदयद्रावक! लग्नानंतर वर्षभरातच चारित्र्यावर संशय, गर्भवती महिलेने उचललं मोठं पाऊल…

हृदयद्रावक! जळगावमध्ये ट्रकची दुचाकीला धडक; चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू…

हृदयद्रावक! राहुरीत आईने दोन चिमुकल्यांसह संपवली जीवनयात्रा…

हृदयद्रावक! गर्भवती महिलेचा मृत्यू अन् बाळही दगावलं; कारण…

हृदयद्रावक! आळंदीवरून सहलीला गेलेले ८ विद्यार्थी दिवेआगर बीचवर बुडाले, पाहा नावे…

हृदयद्रावक! बहिणीकडून राखी बांधल्यानंतर भावाने संपवले जीवन; भावनिक मेसेज व्हायरल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!