पुणे पोलिस दलातील पोलिसाचा कारनामा अन् सेवेतून बडतर्फ…

पुणे : पुणे शहर पोलिस दलात असलेला पोलिस कर्मचारी वैद्यकीय रजेचा बनाव रचून आंतरराज्यीय अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्याचे उघडकीस आले आहे. पुणे पोलिस दलाने त्याला थेट सेवेतून बडतर्फ केले आहे.

नितीन ज्ञानू शिंदे (विश्रामबाग वाहतूक विभाग, पुणे) असे या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. पोलिस अंमलदार नितीन शिंदे हा ७ ऑक्टोबर २०२६ पासून आजारपणाचे कारण देऊन रजेवर गेला होता. रजेवर असताना तो अमली पदार्थांच्या आंतरराज्यीय तस्करीत सक्रियपणे सहभागी झाल्याचे समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

तेलंगण राज्यातील वारंगल जिल्ह्यातील नेक्कोंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ ऑक्टोबर रोजी तेथील स्थानिक पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईदरम्यान नितीन शिंदे याला तब्बल १२ किलो गांजासह जागीच अटक करण्यात आली. पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या या गंभीर कृत्याची नोंद घेत, पुणे शहर पोलिस दलाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी तातडीने नितीन शिंदे याला सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश जारी केले आहेत. पोलिस खात्यात राहून अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी होणाऱ्यांना या कारवाईने कडक इशारा देण्यात आला आहे.

पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

विषारी दारू! पुणे ग्रामीण पोलिस दलातील चार जणांचे तत्काळ निलंबन…

पुणे शहरातील महिला पोलिसाचे निलंबन; धक्कादायक धमकी…

पुणे पोलिस आयुक्तांचे PRO सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याचं निलंबन…

पुणे! PSIचा कॅफेमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन; अन् आता…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!