
पोलिस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी…
सांगली: सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी आढळून आली आहे. संजयनगर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सांगली जिल्हा पोलिस दलात काम करणाऱ्या एका कॉन्स्टेबलचा फोटो रस्त्याच्या कडेला वेताच्या टोपलीमध्ये ठेऊन काळी बाहुली, हळदी-कुंकू, कापलेले लिंबू, बांगड्या आणि धमकीचा मजकूर असलेली चिठ्ठी आढळली. याप्रकरणी अर्चना दत्ता यमगर (वय 32, रा. लक्ष्मीनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या पतीचे नाव दत्ता यमगर असून, ते ड्युटीवर असताना हा प्रकार समोर आला.
View this post on Instagram
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, अर्चना यमगर या आपल्या कुटुंबियांसह शहरातील जुना बुधगाव रोडवरील लक्ष्मीनगर परिसरात राहतात. त्यांचे पती दत्ता यमगर हे जिल्हा पोलिस दलात कार्यरत आहेत. 21 ऑक्टोबर रोजी त्यांच्या शेजारी राहणारे दत्ता लवटे यांनी अर्चना यमगर यांना येऊन या प्रकाराची माहिती दिली.
जुना बुधगाव रोडवरील बिरोबा मंदिराजवळ, आदर्श अकॅडमी क्लासेस परिसरात रस्त्याच्या बाजूला एका वेताच्या टोपलीमध्ये वरील वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दत्ता यमगर यांचा फोटो आणि धमकीवजा मजकूर असलेली चिठ्ठी आढळली. चिठ्ठीमध्ये, ‘तू माझं वाटोळं केलंय, तुझं पण वाटोळं करणार. तुझी आई, बहीण, बायको रस्त्यावर आणणार,’ अशा आशयाचा मजकूर लिहिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या मजकुरातून संबंधित व्यक्तीला धमकावण्याचा आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आले. सदर घडलेल्या या प्रकारानंतर अर्चना यमगर यांनी संजयनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013 मधील कलम 3(2) च्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र हादरला! जादूटोणाच्या संशयातून दोन जणांना जाळले जीवंत…
भोंदूबाबा म्हणाला; अंगात शिरले भूत अन् केला लैंगिक अत्याचार…
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला अन् विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ; गुंगीचे औषध आणि छुपे कॅमेरे…
पुणे शहरात उच्चशिक्षित महिलेसोबत भोंदूबाबाने केला अत्यंत घृणास्पद प्रकार…
महाराष्ट्रात आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड; महिलेवर अत्याचार…

