
इंजिनीअर युवतीने रात्रीच्या सुमारास प्रियकराला केला व्हिडिओ कॉल अन्…
हैदराबाद: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृतदेह राहत्या घरात संशयास्पद स्थितीत आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराला व्हिडीओ कॉलवर धमकी दिल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनीअर युवतीचा मृतदेह फ्लॅटमध्ये सापडला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अर्चना चौधरी मलिक (वय २९) असे मृत युवतीचे नाव आहे.
हैदराबादच्या माइंडस्पेस आयटी कॉरिडॉरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या अर्चना मलिक हिचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना हिने रात्री अडीचच्या सुमारास तिच्या ऑफिसमधील एका सहकाऱ्याला व्हिडीओ कॉल केला होता. त्यावेळी तिचा सहकारी शहराच्या बाहेर त्याच्या आई सोबत एका कार्यक्रमात होता. माझ्या सोबत लग्न केलं नाहीस, तर जीव देईन, अशी धमकी अर्चनाने संबंधित सहकाऱ्याला व्हिडीओ कॉलवर दिली होती. सहकाऱ्यानं अर्चनाला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिनं प्रतिसाद दिला नाही. अखेर पहाटे साडे पाचच्या सुमारास तो अर्चनाच्या फ्लॅटवर पोहोचला. तेव्हा दरवाजा आतून बंद होता. परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि फ्लॅटचा दरवाजा तोडला. तेव्हा आतमध्ये अर्चना मृतावस्थेत सापडली.
View this post on Instagram
पोलिसांनी फ्लॅट सील केला असून फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाचे तिच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या विमल या युवकासोबत प्रेम संबंध होते. तो मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. विमल आधीपासूनच विवाहित असून त्याच्या घटस्फोटाची केस न्यायालयात प्रलंबित आहे. माधापूर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर संतापाचा कळस! भररस्त्यात नग्न धिंड अन्…
कोल्हापूर! लग्न ठरल्याने प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून; प्रियकराने सांगितले…
दोन मुलांच्या आईला नवऱ्याने भररस्त्यात प्रियकरासोबत पकडले; मिठी मारली अन्…
Video! पुणे शहरात MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या प्रियकरानं केले अपहरण अन्…
पती भजनाच्या कार्यक्रमात व्यस्त अन् पत्नी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत…

