तीन कोटींचे बेकायदा फटाके जेएनपीए बंदरावर जप्त; डीआरआय अधिकाऱ्यांकडून मुख्य संशयिताला अटक…

उरण: नवी मुंबईतील जेएनपीए बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई करत सुमारे तीन कोटी रुपये किमतीचे १० हजार किलोग्रॅम बेकायदेशीर फटाके जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी संशयास्पद आयात केलेला कंटेनर रोखून त्याची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील मुख्य सिंडिकेट सदस्याला अटक करण्यात आली आहे.

तपासणीदरम्यान कंटेनरच्या सुरुवातीच्या तीन रांगांमध्ये ‘बाटल्या आणि वॉलपेपर’ असा घोषित केलेला माल आढळला. मात्र, या मालाच्या आड कंटेनरच्या उर्वरित भागात ‘२८८ गॅटलिंग’ या नावाने ओळखले जाणारे तब्बल १९ हजार ८०० बेकायदेशीर फटाके लपवून आणण्यात आल्याचे आढळून आले. घोषित मालासह लपवलेले फटाके सीमा शुल्क कायद्यानुसार जप्त करण्यात आले आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!