हवालदारावर हल्ला केल्याप्रकरणी ‘आप’चे सौरभ भारद्वाज, जरनैल सिंग यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल…

नवी दिल्ली: दिल्ली सरकारचे मंत्री परवेश वर्मा यांच्या कानशिलात मारल्याची घटना आता वाऱ्यासारखी पसरते आहे. एका पोलिस हवालदारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यात सौरभ भारद्वाज, जरनैल सिंग आणि ‘आप’च्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. साहिब सिंग यांच्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी काल (सोमवारी) टिळक नगरला भेट दिली. साध्या वेशातील दिल्ली पोलिसांचा एक हवालदार व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. ‘आप’ समर्थकांच्या जमावाने त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्या हवालदाराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणणे आणि त्याला मारहाण करणे यासंबंधीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी ‘आप’चे आमदार जरनैल सिंग यांच्या विरोधात सार्वजनिक कार्यक्रमात अडथळा आणणे आणि धमकी देणे यासंबंधीच्या कलमांखाली एफआयआर दाखल केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!