
लातूरमध्ये भोंदूबाबचे कांड; आई-वडीलांना बसवलं घराबाहेर अन् आतमध्ये शारीरिक संबंध…
लातूर: एका भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक लातूर शहरात उघडकीस आली आहे. तुझ्या पत्रिकेत कुंडली दोष आहे आणि तो दूर करण्यासाठी घरातील पूजा करावी लागेल, असा बनाव रचून एका भोंदू बाबाने (वय ४०) अल्पवयीन मुलीवर (वय १७) अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
लातूर शहरातील एका मुलीचे लग्न जुळण्यात अडथळे येत असल्यामुळे तिचे आई-वडील काळजीत होते. परिचयातील काही लोकांनी त्यांना रामेश्वर हणमंतराव रामदासी (वय ४०) या भोंदू बाबाबाबत माहिती दिली. भोंदू बाबा पूजा-अर्चा करून कुंडली पाहणे आणि दोष निवारण करण्याचे दावे करायचा. मुलगी आणि तिचे आई-वडील या भोंदू बाबाकडे गेले असता, त्याने मुलीची पत्रिका पाहून तिच्या पत्रिकेत मोठा ‘कुंडली दोष’ असल्याचे सांगितले. हा दोष दूर करण्यासाठी घरी विशेष पूजा घालावी लागेल असा सल्ला त्याने दिला. या विश्वासापोटी कुटुंबाने जून २०२६ मध्ये भोंदूला आपल्या घरी पूजेसाठी बोलावले.
View this post on Instagram
घरी आल्यावर भोंदूने वरच्या मजल्यावरील खोलीत पूजेची मांडणी केली आणि मुलीच्या आई-वडिलांना दुसऱ्या खोलीत बसवलं. त्यानंतर वरच्या खोलीचा दरवाजा आतून लावून भोंदू रामेश्वर रामदासी याने मुलीला सांगितले की, “जर कुंडली दोष पूर्णपणे काढून टाकायचा असेल तर माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील”. तसेच ही बाब कोणालाही सांगितल्यास कुंडली दोष निघणार नाही अशी भीती दाखवून त्याने तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला.
घटनेला सुमारे तीन महिने उलटल्यानंतर पीडित तरुणीची प्रकृती बिघडल्याने ती ३ महिन्यांची गरोदर असल्याचे उघड झाले. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेच्या कुटुंबाने तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून लातूरच्या विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात आरोपी भोंदू रामेश्वर रामदासी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने आरोपी भोंदूला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलगी गरोदर असल्याने आरोपी आणि गर्भाची डीएनए (DNA) चाचणी केली जाणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे लातूर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला अन् विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ; गुंगीचे औषध आणि छुपे कॅमेरे…
भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…
भोंदूबाबाने पतीला बाहेर पाठवलं अन् पत्नीसोबत नको ते केलं…
पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…
पुणे शहरात उच्चशिक्षित महिलेसोबत भोंदूबाबाने केला अत्यंत घृणास्पद प्रकार…

