पुणे! जुन्नरच्या पिंपळवंडीत अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं; घराबाहेर बोलावलं अन्…

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात अल्पवयी मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 18) दुपारी 3:30 ते चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या विकृत कृत्यामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि तपास जलद गतीने पूर्ण करून पिडितेला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी पिंपळवंडी ग्रामस्थांनी केली आहे. तर या संतापजनक घटनेप्रकरणी पुणे पोलिस अधीक्षक, संदीपसिंह गिल यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे. सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा, पाहणी हे चालू आहे आणि इतर तपासणी जी आहे ते त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

संदीपसिंह गिल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की, मंगळवारी (ता. १८) संध्याकाळी दुपारच्या नंतर एका २५ वर्षाच्या तरुणाने एका ९.५ वर्षाची जी मुलगी आहे, तिच्या शेजारील घरात राहत होती. ती घरी दुसऱ्या मुलांबरोबर खेळत असताना आणि टीव्ही बघत असताना, तिला बाहेर घेऊन गेला आणि गावाबाहेर हे जे शेत आहे, त्या शेतात पुढे जाऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि तिची हत्या केली आहे. जो आरोपी आहे, त्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील जो तपास आहे तो चालू करण्यात आलेला आहे. सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा, पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणीची प्रोसेस सुद्धा चालू आहे.

दरम्यान, आरोपीने सायकलवरून मुलीला उसाच्या शेताच्या परिसरात नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय असून, या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार नोंदवली. त्यानंतर तपासादरम्यान ही गंभीर घटना समोर आली. ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

नसरापूरची पुनरावृत्ती! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत…

नसरापूर अत्याचार प्रकरणातील मोठी बातमी! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा…

नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर आजोबाने केला अत्याचार…

पुणे! अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने कॅफेमध्ये केला लैंगिक अत्याचार अन्…

पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने केला अत्याचाराचा प्रयत्न…

पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!