केतन अग्रवाल हत्या प्रकरण! सिया अन् चेतन गेले दोन वेळा लॉजवर अन्…

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी 5000 हून अधिक पानांची चार्जशीट दाखल केली असून या प्रकरणात आणखी मोठमोठे खुलासे होताना दिसत आहेत. सिया गोयल हिचा प्रियकर चेतन चौधरी याने व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरील चॅट डिलीट केल्यानंतर तो डेटा पोलिसांना पुन्हा मिळू शकतो का, अशी विचारणाही केल्याचे पोलिसांच्या नोंदीत आहे. त्याचबरोबर चेतन याचे फक्त सियाच नाही तर इतर तरुणीसोबत प्रेमप्रकरण होतं, असा खुलासा देखील झाला आहे.

पुणे शहरातील एनआयबीएम रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सिया आणि चेतन यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये बुकिंग केल्याची माहिती आहे. तर त्यानंतर दोघांनी जानेवारी 2026 मध्ये गुलटेकडी परिसरातील एका हॉटेलमध्ये दोघांनी बुकिंग करून मुक्काम केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हॉटेलच्या व्यवस्थापकाचाही पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. यामुळे सिया आणि चेतन यांच्यातील प्रेमसंबंध पुन्हा चर्चेत आले आहेत. पण या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट पोलिसांच्या हाती लागला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांनी दोन कॉलेजमधील तरुणींचे जबाब मिळाले असून त्यांनी चेतनविषयी मोठा खुलासा केला आहे. एक युवती लातूरची असून ती दुसऱ्या एका तरुणीसोबत पुण्यात राहत होती. 9 मे 2026 रोजी म्हणजे केतनच्या हत्येच्या एका महिन्याआधी दोघी पुण्यातील एस.बी. रोडवरील एका क्लबमध्ये गेले होते. मैत्रिणी एकीच्या प्रियकरासह आणि चेतन चौधरीसोबत होते. पार्टीमध्ये सर्वांनी दारू प्यायली होती. रात्री उशीर झाल्यानं चौघं मार्केट यार्डमधील एका लॉजवर मुक्कामासाठी गेले. तिथे त्यांच्यातील तरुणी आणि प्रियकर एका खोलीत गेले तर दुसरी तरूणी चेतनसोबत एकाच खोलीत जाताना दिसली.

चेतन याने सियाला धोका देत तिच्याशी रिलेशनशिप ठेवण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केल्याचा आरोप तरुणीने केल्याचा आरोप केला गेला आहे. दुसऱ्या दिवशी तिने ही बाब मैत्रिणीला सांगितली. तसेच चेतनने आपल्यासोबतही दोन-तीन वेळा रिलेशनशिपमध्ये राहण्याचा प्रयत्न केल्याचे मैत्रिणीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे चेतन फक्त सियासोबत नाही तर इतर तरुणींसोबत देखील रिलेशनशीपमध्ये होता, असा आरोप केला जात आहे.

पुणे! सियाच्या फोनमधून ‘मानसी गोविंदपूरकर’चं कनेक्शन समोर! Chat GPT ला विचारलं…

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी सिया गोयलचा होणार ‘गेम ओव्हर’…

सिया गोयल आणि चेतन चौधरी याच्याबाबत हादरवणारी माहिती समोर…

सिया गोयल हिचं व्हॉट्सॲप चॅटमधून उघड झाली धक्कादायक माहिती…

सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा! केतनसोबत महाबळेश्वरला रुममध्ये राहायचं नव्हतं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!