
नसरापूरची पुनरावृत्ती! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत…
पुणे : पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर (वय ९) लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात मंगळवारी (ता. १८) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
एका युवकाने सायकलवरून मुलीला उसाच्या शेताच्या परिसरात नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय असून, या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे हरविल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर तपासादरम्यान ही गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
View this post on Instagram
पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदिप गिल हे घटनास्थळी उपस्थित राहून तपासाचा आढावा घेत आहेत. विविध तपास यंत्रणा कामाला लावण्यात आल्या असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि तपास जलदगतीने पूर्ण करून पीडितेला न्याय मिळाला पाहिजे,’ अशी मागणी पिंपळवंडी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या युवकाने ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला शेतात नेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुन्नरच्या आमदारांच्या गावातच चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.
नसरापूर अत्याचार प्रकरणातील मोठी बातमी! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा…
नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर आजोबाने केला अत्याचार…
पुणे! अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने कॅफेमध्ये केला लैंगिक अत्याचार अन्…
पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने केला अत्याचाराचा प्रयत्न…
पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

