
पुणे! ‘अरे तू, पोरींना काय बोलला. आमच्याबरोबर चल…’, रिल स्टार अटकेत…
पुणे: पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरातील फ्लाईंग जिप्सी हॉटेलसमोर शनिवारी पहाटे युवकाच्या डोक्यात शस्त्राने वार करुन त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. शिरोळे रोडवरील एका कॅफेमध्ये, जुन्हा वादातून झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगताप गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. डेक्कन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, ‘रील’ स्टार माधवी कुंभार हिच्या सह सात जणांना अटक केली आहे.
अरे तू, पोरींना काय बोलला. आमच्याबरोबर चल, तुला दाखवितो, अशी धमकी दिली. अथर्व घाबरून हॉटेलमध्ये पळाला. त्यावेळी आरोपी युवती आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ केली. याला मारा, जिवंत सोडू नका, असे धमकावत शस्त्राने वार केला. हॉटेलमध्ये घुसून त्याला खुर्चीने मारहाण केली. तर लाथाबुक्क्यांनी तुडवलं होते.
View this post on Instagram
दरम्यान, या प्रकरणाची खरी सुरूवात तर साताऱ्यात झाली होती. खरा वाद हा ‘कॅफे फ्लाईंग जिप्सी’मध्ये नाही तर कास पठारावर झाला होता. काही दिवसांपूर्वी कास पठारावर स्टंट करताना कारला कट मारल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून एका रीलस्टारवर दुसर्या महिला रीलस्टारच्या गटाने कोयत्याने गळ्यावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार डेक्कन परिसरातील कॅफे फ्लाईंग जिप्सी येथे पहाटे घडला होता. डेक्कन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन 2 तरुणींसह 7 जणांना अटक केली आहे.
या प्रकरणी माधवी कुंभार (रा. काळेपडळ, हडपसर), स्नेहल सोनके (रा. पिंपळे गुरव), शार्दुल ओव्हाळ (रा. हडपसर) यांना अटक झाली आहे. जगताप याच्या डेक्कन पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार आरोपी युवती, फिर्यादी अथर्व जगताप हे ओळखीचे आहेत. सातारा येथे त्यांची काही महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. शनिवारी (ता. १५) पहाटे सव्वातीनला अथर्व हा फ्लाईंग जिप्सी हॉटेलमधून बाहेर पडत असताना टोळक्याने अडवले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! मोशी येथील सोनाली मृत्यू प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
पुणे! भोंदूबाबावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप; मुलींना मांडीवर बसवतो…
पुणे शहरातील पबमध्ये पार्टी रंगली असतानाच पोलिसांची अचानक धाड अन्…
पुणे! एक कोटी दरोडा प्रकरणानंतर पैसेही गेले अन् पोलिसाची वर्दीही गेली…
कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट; पुणे पोलिसांच्या वाहनाचा शिवाजीनगर कोर्ट ते चाकण थरारक पाठलाग…

