
पुणे! येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी अन् पोलिसांनी दाखवला खाकीचा हिसका…
पुणे: येरवडा कारागृहात कैद असलेल्या आरोपी गुंड मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहाबाहेर फटाकेबाजी केल्यानंतर त्याची रिल सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी कारवाई केली आहे. येरवडा पोलिसांनी शंकर भालके याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
येरवडा कारागृहात कैद असलेला आरोपी सुलतान सय्यद याच्या वाढदिवसानिमित्य जेल परिसरातील संरक्षक भिंतीजवळ शंकर भालके या आरोपीने फटाकेबाजी केली. सोबतच या फटाकेबाजीचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. ‘हॅपी बर्थडे सुलतान भाई’ म्हणत येरवडा जेल बाहेर केलेली फटाकेबाजी पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर पोलसांनी तात्काळ कारवाई करत शंकर भालके याला अटक केली. त्यामुळे भाईगिरी करत सोशल मीडियावर हवा करणाऱ्यांची पोलसांनी आता चांगलीच हवा काढली आहे.
View this post on Instagram
येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते म्हणाले, आमच्या सोशल मीडिया टिमने सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन आरोपीचा शोध घेतला. गुन्हेगारीला प्रोत्साहन दिल्या प्रकरणी पोलिस विभागाकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. लक्ष्मीनगर पोलिसांकडून फटाकेबाजी करणाऱ्याला अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरु आहे.
पुणे शहरात लक्ष्मीनगर पोलिसांकडून दारूभट्ट्या चालवणाऱ्या महिलांसाठी प्रशिक्षण मेळावा…
पुणे! एटीएम मशीन मध्ये छेडछाड करून नागरीकांची फसवणूक करणारे ताब्यात…
पुणे! पोलिसांच्या वाहनाच्या बोनेटवर बसवून फिरवल्याप्रकरणी कारवाई…
कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट; पुणे पोलिसांच्या वाहनाचा शिवाजीनगर कोर्ट ते चाकण थरारक पाठलाग…
पुणे! कात्रज बोगद्याजवळ रक्तरंजित थरार; बापाच्या हत्येचा 24 वर्षांनी घेतला बदला…

