कोल्हापूर! प्रियकराने केलेल्या माजी सरपंचबाईंच्या हत्येत आला नवा ट्विस्ट…

कोल्हापूर : शहापूर येथील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांची हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून प्रियकरानेच त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुरेखा न्यारे या आपला प्रियकर प्रकाश पाटील याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होत्या. त्याच्याकडे वारंवार लग्नाची मागणी करत होत्या, त्यामुळे प्रकाशने सुरेखा यांची हत्या केल्याचं बोलले जात आहे. मात्र, आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

सुरेखा न्यारे यांची हत्या अनैतिक संबंधातून झालीच नाही. त्यांनी लग्नासाठी तगादा लावला नव्हता, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पैशांच्या वादातून सुरेखा न्यारे यांना प्रकाश पाटील याने संपवल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. माजी सरपंच सुरेखा यांनी प्रकाश पाटील याला गाडी घेण्यासाठी आर्थिक मदत केली होती. त्यांनी आपले स्वत:चे दागिने गहाण ठेवून प्रकाशला मदत केली होती. हेच गहाण ठेवलेले दागिने पुन्हा सोडवून देण्यासाठी न्यारे यांनी प्रकाशकडे तगादा लावला होता. पण प्रकाश पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर सुरेखा यांच्याकडे वारंवार होणारी पैशांच्या मागणीमुळे प्रकाशने सुरेखा यांच्या हत्येचा कट रचल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सुरेखा न्यारे आणि प्रकाश पाटील हे दोघे एकाच गल्लीत राहत असल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. रविवारी सकाळी आरोपी प्रकाशने सुरेखा यांना पंढरपूरला जाण्याचे सांगून कारमध्ये बसवले. मात्र, त्याने त्यांना गावाबाहेरील लिंडोरी येथील एका जनावरांच्या शेडमध्ये नेऊन गळा आवळून त्यांचा खून केला. हत्येनंतर आरोपीने सुरेखा यांचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि कारने मुंबईजवळील कशेळी (जि. ठाणे) येथील समुद्रात टाकण्यासाठी निघाला. तेथे पोहोचल्यानंतर मृतदेह फेकण्यास मदत हवी म्हणून प्रकाशने ठाण्यातील आपल्या संदेश नावाच्या भाच्याला फोन केला. भाच्याला संशय आल्याने त्याने लगेचच प्रसंगावधान राखत पोलिसांना याची माहिती दिली. नारपोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि मृतदेह समुद्रात फेकण्याचा त्याचा कट उधळून लावला. या प्रकरणाचा पुढील तपास शाहूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे करत आहेत.

दरम्यान, सुरेखा यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वीच आजारपणाने निधन झाले होते. त्यामुळे त्यांचा एकुलता एक मुलगा शुभम याच्यावर लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी आली होती. आता अचानक आईचेही छत्र हरपल्यामुळे शुभम अनाथ झाला असून, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शिरगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा म्हशीच्या गोठ्यात आवळला गळा अन्…

मेकॅनिक प्रियकराने बँक कर्मचारी प्रेयसीचा घेतला जीव…

प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर आरोप; कंडोम फेकले अन्…

पुणे! प्रियकराने चार मित्रांच्या हवाली केलं मैत्रिणीला अन् कधी लॉज तर कधी…

नाशिक! वैष्णवी आवारे हत्येचा उलगडा; प्रियकराला दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग…

विवाहितेने प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा, सीसीटीव्हीने भांडाफोड…

प्रियकराच्या सांगण्यावरून नर्सने केला नवऱ्याचा सलाईनमधून क्रुर मर्डर…

प्रियकर सक्षमचं घर का सोडलं? आंचलने सांगितलं धक्कादायक कारण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!