पुणे! लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; मला बघताच पळतो; नेत्यावर गंभीर आरोप…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्षे फसवणूक केल्याचा गंभीर आरोप युवतीने केला आहे. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. २७) घडली. मात्र, तेथे उपस्थित पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पीडित युवतीने दावा केला आहे की, कॉलेजपासून दोघांचे प्रेमसंबंध होते आणि मंगेश जगताप यांनी लग्नाचे आश्वासन देत अनेक वर्षे प्रेमसंबंध कायम ठेवले. नंतर त्यांनी दुसरे लग्न केल्याचे समोर आले. घटस्फोट घेणार असल्याचे सांगून काही कागदपत्रेही दाखवली, मात्र ती बनावट आहेत. तसेच, या प्रकरणात संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही माहिती असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी सुरू असून, मंगेश जगताप यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पीडित युवतीने म्हटले आहे की, ‘मंगेश जगताप यांचे संपू्र्ण कुटुंब यामध्ये सामील आहे. त्यांची मेव्हणी पोलिस आहे. दोन मित्र अमर अशोक जगताप, रणजीत तांबडे… या सगळ्यांना हा प्रकार माहिती आहे. गेले तीन महिने झाले, मी वाट बघतेय. तीन महिने झाले तो गायब आहे. मी दिसली की पळून जातोय. मला एकच प्रश्न आहे…मुलगा असता तर तुम्ही हिंदू-मुस्लिम करुन सगळं केले असते. आमचं लग्न ठरलेलं. आम्ही महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट बूक केलेले. 29-30 तारीख काढलेली…सगळे माझ्याकडे पुरावे आहेत. कॉलेजपासून आमचं प्रेमप्रकरण होतं. मात्र खोटं बोलून त्यानं लग्न केलं. मला समजताच मी घटस्फोट घेतोय, असे म्हणत सगळी कागदपत्रं दाखवली. परंतु ही घटस्फोटाची कागदपत्रंच खोटी निघाली 21 वर्षे माझ्या आयुष्याशी का खेळला?’

पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना आणि विविध मुद्द्यांवर चर्चा रंगलेली असतानाच या पीडित युवतीने अचानक सभागृहात प्रवेश केला आणि सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले, ज्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. मात्र, तेथे तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी तात्काळ धाव घेत युवतीला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचा दावा केला असून, वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने आणि प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने अखेर उद्विग्न होऊन हे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचे युवतीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

PSI चा विवाहित शिक्षिकेवर वारंवार अत्याचार; माझे तिच्यावर प्रेम…

कोल्हापूरमध्ये प्रेमविवाहाचा भयानक शेवट; संशयावरून पत्नीला संपवलं अन् मारला मिशीवर ताव…

सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…

नांदेड! आंचल मामीडवार प्रेम प्रकरणात आला मोठा ट्विस्ट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!