महिला IPSचे अश्लील Video काढून पतीला पाठवल्याचा गंभीर आरोप अन् आत्महत्येचा प्रयत्न…

हैदराबाद: सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी (SVPNPA) मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या एका ट्रेनी IPS अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या अधिकाऱ्यावर एका महिला प्रशिक्षणार्थी ips अधिकाऱ्याचा लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग आणि पतीला अश्लील व्हिडीओ पाठवल्याचा गंभीर आरोप आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनी ips अधिकारी उदय कृष्णा रेड्डी यांना सोमवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास बेशुद्धावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ ‘गॅस्ट्रिक लॅव्हेज’ (पोट साफ करण्याची प्रक्रिया) केली, परंतु त्यात कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळून आलेली नाही. सध्या रक्त आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून सर्व वैद्यकीय पॅरामीटर्स सामान्य आहेत. त्यांच्या कॉटजवळ दारूची आणि सॅनिटायझरची बाटली सापडल्याची माहिती आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांना एक हस्तलिखित सुसाईड नोट सापडली असून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

ट्रेनी ips अधिकारी उदय कृष्णा रेड्डी ज्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत होते, त्याच अकॅडमीमधील एका ३० वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी ips अधिकाऱ्याने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रेड्डी हे २३ जूनपासून मेसेजिंग ॲपद्वारे अश्लील संदेश पाठवत होता आणि अकादमीमध्ये इतर मित्रांसमोर अपमानकारक टिप्पणी करत होता. ९ जुलै रोजी रेड्डी यांनी पीडित महिला ips अधिकाऱ्याचा रस्ता अडवून त्यांना जबरदस्तीने स्वतःच्या खोलीत नेले, केस ओढले, गळा दाबण्याचा प्रयत्न केला. खोलीतून बाहेर पडू नये म्हणून आपल्या गळ्यावर चाकू लावला. तसेच १० जुलै रोजीही त्याने पुन्हा हल्ला केला, असा गंभीर आरोप केला आहे.

आरोपीने सहमतीशिवाय तिचे खासगी व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते व्हिडिओ तिच्या पतीला पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारानंतर पीडित महिला ips अधिकाऱ्याने १८ जुलै रोजी अट्टापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी ट्रेनी आयपीएस अकॅडमी सोडून निघून गेला होता. दरम्यान, SVPNPA द्वारे या प्रकरणी अंतर्गत चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

दुसरीकडे, आरोपी अधिकाऱ्याने सोशल मीडियावरून हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, ‘आपल्याला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि सत्य लवकरच समोर येईल,’ असा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा आरोपी अधिकारी आधी आंध्र प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

महाराष्ट्राचे सुपूत्र IPS विनायक भोसले यांच्या उत्तर प्रदेशात धडाकेबाज कारवाया…

महाराष्ट्रातील सुपुत्र अखेरच्या प्रयत्नात झाला IPS अन् दिला राजीनामा…

जिद्दीच्या जोरावर बनला IPS; गावकऱ्यांनी काढली चक्क हत्तीवरून मिरवणूक…

IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना IPS अधिकाऱ्याची आत्महत्या…

Ex IPS शिवदीप लांडे यांची नवी इनिंग सुरू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!