महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक…

तिरुपती (तमिळनाडू): एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आलेल्या कुटुंबाची तब्बल 40 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग खोलीतच राहिली होती. मात्र, हॉटेलमधील महिला कॅशियर शशी यांनी ती बॅग सुरक्षित ठेवली आणि पोलिसांच्या मदतीने मूळ मालकाकडे सुपूर्द केली. या उल्लेखनीय प्रामाणिकपणाबद्दल तिरुपतीचे पोलीस अधीक्षक (SP) एल. सुब्बारायडू यांनी शशी यांचा शाल देऊन सन्मान केला. त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

दागिन्यांचे मालक भरत हे आपल्या कुटुंबासह तिरुपती येथे दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी हॉटेलमधून चेक-आऊट करून बंगळुरूकडे प्रस्थान केले. मात्र, बंगळुरूला पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, सोन्याच्या दागिन्यांची बॅग हॉटेलच्या खोलीतच राहिली आहे. ही बाब समजताच कुटुंबीयांची घाबरगुंडी उडाली. त्यानंतर त्यांनी तातडीने तिरुपती पोलिसांशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. हॉटेलमधील खोलीची तपासणी करताना महिला कॅशियर शशी यांना ही बॅग सापडली. बॅगमध्ये तब्बल 40 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एवढी मोठी संपत्ती समोर असूनही त्यांनी कोणताही मोह न बाळगता ती बॅग सुरक्षित ठेवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

शशी यांनी हॉटेल व्यवस्थापन आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही तातडीने कारवाई करत बॅग मालकापर्यंत सुखरूप पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू केली. तिरुपतीचे पोलीस अधीक्षक एल. सुब्बारायडू यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात शशी यांनी अधिकृतपणे सोन्याची बॅग त्याचे मालक भरत आणि कुटुंबीयांच्या स्वाधीन केली. हरवलेले दागिने सुरक्षित परत मिळाल्यानंतर भरत यांनी शशी यांचे मनापासून आभार मानले. त्यांनी आमचे दागिने प्रामाणिकपणे जपले. त्यांच्या या उपकारांसाठी आम्ही कायम ऋणी राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शशी यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत पोलीस अधीक्षक एल. सुब्बारायडू यांनी त्यांना शाल देऊन सन्मानित केले. आजच्या काळात 40 लाख रुपयांचं सोने समोर असतानाही प्रामाणिक राहणे ही मोठी गोष्ट आहे. अशा कर्मचारी वर्गामुळे समाजात विश्वास टिकून आहे, अशा शब्दांत त्यांनी शशी यांच्या कार्याचा गौरव केला. संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सर्व स्तरांतून महिला कॅशियर शशी यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केले जात आहे.

IPS विनायक भोसले यांची संवेदनशीलता ठरली निर्णायक; कामगिरीचे सर्वत्र होतेय कौतुक…

कौतुकास्पद! महिला कंडक्टरचं लक्ष विद्यार्थिनीकडे गेलं अन्…

IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….

कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!