
सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…
पुणे : केतन अग्रवाल याच्या मृत्यूला सिया गोयल आणि प्रियकर चेतन चौधरी जबाबदार असल्याचे तपासातून समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कर्मचारी नीरज कुमार याला माफीचा साक्षीदार म्हणून स्वीकारले असून त्याचा सविस्तर जबाब नोंदवला जात आहे. सिया आणि चेतन यांच्या अडचणी वाढत असताना सियाच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही फाशी द्या, असे सियाच्या वडिलांनी म्हटले आहे.
दोघांच्या लग्नासाठी 17 कोटींचा महाल बुक केला होता. जयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग होणार होती. त्यासाठी दोन विमानं बुक केली गेली होती? हे सगळं खरं आहे का? असा सवाल विचारल्यानंतर सियाच्या वडिलांनी मोठा खुलासा केला. हे सगळं खरं नाहीये, असं कोणतीही बुकींग झालं नव्हतं. लग्नाचा खर्च, देवदेव या सगळ्या गोष्टी मिळून टोटल खर्च फक्त 4.5 ते 5 कोटींपर्यंतच होणार होता. मुलगी बघण्याच्या कार्यक्रमापासून लग्नापर्यंत सगळा खर्च एवढाच होत होता, असे सियाच्या वडिलांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
तुमच्यामध्ये काही सोनंच्या देणंघेणं झालं होतं का? असा सवाल विचारला गेल्यावर सियाच्या वडिलांनी थोडक्यात उत्तर दिलं. आम्ही त्यांना काही दिलं होतं आणि त्यांनी सियासाठी देखील काही दिलं होतं पण माझ्या घरात रिनोवेशनचं काम असल्याने मी अग्रवाल कुटूंबियांना ते परत केलं होतं, असेही सियाच्या वडिलांनी म्हटले आहे.
अग्रवाल फॅमिलीने आत्तापर्यंत आम्हाला जे जे काही दिलं होतं, ते आम्ही त्यांना माघारी केलं आहे. तसेच माझ्याकडे त्याचं ब्रेसलेट आणि सियाची इंगेजमेंट रिंग आहे, त्या व्यतिरिक्त काहीही नाही, असे सियाच्या आईने सांगितले. आम्हाला शेवटपर्यंत विश्वास बसणार नाही की, माझ्या मुलीने असं काही केलं असेल, असं म्हणत सियाच्या आईला भावना अनावर झाल्या. सिया दोषी असेल तर तिला देखील फाशी व्हायला पाहिजे, असे सियाच्या आईने म्हटले आहे.
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…
केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…
केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…
केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…
पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…
केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…
पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

