केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेला केतन विशाल अग्रवाल (वय २४) याचा मृत्यू हा अपघात नसून, त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच रचलेला पूर्वनियोजित कट होता, असे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

केतन अगरवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी त्यांच्या प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी केतनला दरीत ढकलून संपवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सिया प्रवीण गोयल (वय २०, रा. लीलाकुंज, न्यू एरा सोसायटी, गंगाधाम समोर, बिबवेवाडी) आणि सियाचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी (वय २२, रा. पार्श्वनगर, कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)


सिया गोयलने हा एक अपघात असल्याचे भासवत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. लोणावळा पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली. पण, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना या संपूर्ण घटनेत संशय जाणवला. त्यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे जे सत्य समोर आले त्याने पोलिसांनाही चक्रावून सोडले. पोलिसांनी जेव्हा सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांचे मोबाईल रेकॉर्ड्स (CDR) तपासले, तेव्हा त्यांच्यातील गुप्त प्रेमसंबंधांचा उघड पर्दाफाश झाला. तपासात समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते १८ जून या अवघ्या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २००४ वेळा फोनवर संभाषण झाले होते. या ६ महिन्यांत त्यांनी एकूण २३८ तास एकमेकांशी संवाद साधला होता.

पोलिस तपासात आणि अगरवाल कुटुंबीयांच्या दाव्यानुसार या हत्येमागील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आधीही सियाने हत्येचा प्रयत्न केला होता. सियाने यापूर्वी केतनला ३ ते ४ वेळा लोहगड किल्ल्यावर नेले होते. १४ जून रोजी जेव्हा दोघे पुन्हा लोहगडावर गेले होते, तेव्हाही सियाने केतनला कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक दावा अगरवाल कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी किल्ल्यावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, आरोपी चेतन चौधरी हा अत्यंत संशयास्पद पेहरावात आणि चेहरा लपवून केतन आणि सियावर पाळत ठेवत असल्याचे स्पष्ट दिसले. फोन कॉल्सचा हा भक्कम तांत्रिक डेटा आणि सीसीटीव्ही फुटेजच्या बळावर पोलिसांनी अखेर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान, त्या पोरीचं एका मुलासोबत प्रेमसंबंध होते, ती त्याच्यासोबत फिरायला उदयपूरला देखील गेली होती, तिचे इतर पोरांसोबत देखील अश्लील चॅटिंग आहेत, हे समजत नाही की तिचे किती पोरांसोबत संबंध आहेत, काय आहेत, काय नाहीत, आता सगळं तपासात निघेल तिने तिच्या प्रियकराला अठरा तारखेला गडावर बोलावलं आणि त्याला सांगितलं आमच्या केतनला धक्का मार, असे मृत केतनच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…

केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…

पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…

पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!