अभिनेत्री संचिता उगले हिचे चॅट समोर, आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…

मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिने 14 जून रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. तसेच, तिच्या आत्महत्येच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांकडून होत आहे. संचिताचा तिच्या मुंबईतील एका सहकलाकाराशी झालेला संवाद समोर आल्यानंतर उज्ज्वल शर्मा याच्याकडून तिचा छळ होत होता, असा आरोप संचिताच्या कुटुंबीयांनी केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHWARII💗 (@ishwari16official)

‘छावा’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री संचिता उगले हिने नालासोपारा येथील तिच्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवले. अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. संचिता गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होती, तिला अनेकदा आत्महत्येचे विचार मनात डोकावायचे, असं तिची सहकलाकार मैत्रिण मेघा शर्मा हिने सांगितले. संचिता हिच्या निधनानंतर तिच्या मावशीने आणि वडिलांनी चित्रपटसृष्टीतील काही जणांवर गंभीर आरोप केले आहेत. काही लोकांकडून तिला मानसिक त्रास दिला जायचा, टॉर्चर केलं जायचं असा आरोप अभिनेत्रीच्या मावशीने केला आहे. तिच्या वडिलांनीही संचिता पैशांच्या व्यवहारामुळे नैराश्यात गेल्याचं सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. त्यातच, आता संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर आले आहे.

उज्ज्वल शर्मा हाच संचिताचा छळ करत होता, तिच्याकडून पैसे घेत होता आणि परत करताना अपमानास्पद बोलत होता, अशी माहिती समोर आली आहे. उज्ज्वल शर्माचे हे मेसेज आता समोर आले आहेत, जे उज्ज्वल शर्माने संचिता हिला पाठवले होते. ‘साजन घर’ या मालिकेच्या सेटवर उज्जल हा संचिताचा सहकलाकार होता. जर उज्ज्वल चॅटमध्ये संचिता हिच्याशी अशाप्रकारे बोलत असेल, तर सेटवर त्याचे वर्तन कसे असेल याचा अंदाज लावता येतो. संचिताने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यामागे उज्ज्वलच कारणीभूत होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.

उज्ज्वलने आधी पैसे मागितले आणि मदत मिळाल्यानंतरही तो संचिता हिच्याशी अशा प्रकारे वागत होता, याचे आम्हाला आश्चर्य वाटते. संचिता आणि उज्ज्वल यांच्यातील संबंधांचे सत्य समोर यावे यासाठी आम्ही निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहोत, असे संचिताच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. या घटनेनंतर उज्ज्वलने आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही, तसेच तो कुटुंबीयांना भेटायलाही आलेला नाही. उज्ज्वल आमच्या मुलीला सतत त्रास देत होता, त्यामुळे ती नैराश्यात (डिप्रेशनमध्ये) गेली होती, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

‘छावा’मध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप; धक्कादायक योगायोग…

प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेतील पात्राप्रमाणेच उचललं मोठं पाऊल…

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन…

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या व्हिडीओने उडवली एकच खळबळ…

अभिनेत्रीच्या एकुलत्या एका मुलाने 57व्या मजल्यावरून मारली उडी…

संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!