निलेश घायवळ याच्या भावाला राजस्थानमधून अटक, मंदिरातील प्रसादावर…

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून अटक केली आहे. सचिन घायवळ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याच्यावर पुण्यात खून, खंडणी आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. फरारी असताना तो राजस्थानमधील एका घरात लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने राजस्थानमध्ये सापळा रचून कारवाई केली आहे.

पोलिसांकडून मकोका कारवाई झाल्यानंतर आणि नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या सचिन घायवळ याला गुरूवारी (ता ४) रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. सचिन हा गुंड निलेश गायवळ मोठा भाऊ आहे. सचिन वर खून, खंडणी, खुनाचे प्रयत्न, धमकी यासारखे अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सचिन फरार होता. राजस्थान येथील सिकर जिल्ह्यातून सचिन घायवळ याला ताब्यात घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पथकाने सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात सापळा रचून ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. खंडणीप्रकरणात मकोकाअंतर्गत कारवाई झाल्यानंतर सचिन घायवळ पुण्यातून पसार झाला होता. त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र, वारंवार ठिकाण बदलत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर तो राजस्थानातील सिकर जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले.

गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ व्यवसायाने शिक्षक असून, एका नामांकित शाळेत कार्यरत होता. तो कुख्यात गुंड नीलेश घायवळचा मोठा भाऊ आहे. त्याच्याविरोधात कोथरुड आणि वारजे पोलिस ठाण्यांमध्ये एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. वारजे पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या ४४ लाख ३६ हजार रुपयांच्या खंडणी प्रकरणात त्याच्यावर मकोका लावण्यात आला होता. कर्वेनगर, वारजे आणि शिवणे परिसरातील शाळांना खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपनीच्या महिला संचालिकेकडून खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात नीलेश घायवळ, सचिन घायवळ आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सचिन फरार झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन घायवळ पुण्यातून पळून गेल्यानंतर काही वेळ सोलापूरमध्ये भाड्याच्या घरात रहात होता. त्यानंतर तो जयपूरमार्गे सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात गेला. १० फेब्रुवारीपासून तो तेथे वास्तव्यास होता. महिन्याला साडेसहा हजार रुपये भाडे देऊन तो राहत असल्याची माहिती होती. फरार होताना त्याच्याकडे साडेतीन लाख रुपये रोख होते. त्याच पैशांतून तो खर्च भागवत होता. तसेच गावातील मंदिरात मिळणाऱ्या प्रसादावर त्याने अनेक दिवस काढल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

सचिन घायवळ दाढी वाढवून, ओळख बदलून तो राजस्थानमध्ये एका छोट्याशा खोलीत राहत होता. एवढंच नाही तर त्याने स्वतःच्या कुटुंबीयांशीही संपर्क तोडला होता. मात्र एका नातेवाईकाशी झालेल्या एकमेव फोन कॉलवरून पुणे क्राईम ब्रांचने त्याचा माग काढला.

सचिन घायवळ 9 महिन्यांपासून फरार
दाढी वाढवून ओळख बदलण्याचा प्रयत्न
राजस्थानच्या सीकरमध्ये घेतला आश्रय
9 महिने कुटुंबीयांशी तोडला संपर्क
काही दिवसांपूर्वी एका नातेवाईकाला केला फोन
पुणे क्राईम ब्रँचनं फोनवरून काढला माग
मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलीस सीकरमध्ये
सीकरमध्येही पोलिसांना दिला गुंगारा
सिनेस्टाईल पाठलाग करत आवळल्या मुसक्या

सचिन घायवळचा गुन्हेगारी इतिहास…
2010 ते 2015 – खुनाचा प्रयत्न, प्रतिस्पर्धी टोळीवर हल्ले, निलेश घायवळ टोळीच्या गुन्ह्यात सहभाग
2014 – पप्पू ऊर्फ सचिन कुडले खून प्रकरण खून प्रकरणात तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी पोलिसांकडून मकोकांतर्गत कारवाई
2014- 2015- बेकायदेशीर शस्त्र बाळगणे
2014- 2024 – खंडणी, मारहाण, टोळीयु्द्ध विरोधी टोळीतील दोघांच्या खुनाशी अप्रत्यक्ष सहभाग
2015- टोळीयुद्धामुळे वर्षभरासाठी तडीपार
2019- खून प्रकरणातून पुराव्याअभावी मुक्तता या प्रकरणी उच्च न्यायालयात अपील

कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या थोबाडीत मारणाऱ्या पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू…

निलेश घायवळ गँगच्या सदस्याला अटक; धक्कादायक माहिती समोर…

कुख्यात गुंड निलेश घायवळ याला अखेर मोठा दणका…

निलेश घायवळ याची ‘8055 BOSS’ अशी नंबर प्लेट असलेली गाडी जप्त…

निलेश घायवळसह बंधुंचा आणखी एक कारनामा समोर…

गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!