Video: पुणे शहरात युवकावर कोयत्याने सपासप वार, पुलावरून खाली पडला अन्…

पुणे: पुणे शहरातील कात्रज परिसरात दिवसाढवळ्या एका युवकावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पुणे शहरातील नवले ब्रीजजवळील राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर तीन आरोपींनी युवकाला गाठलं आणि धारदार शस्त्राने सपासप वार केले. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेचा प्रसंग एका प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज चौक ते नवले ब्रिज दरम्यान ही थरारक घटना घडली. सूरज माणिक काळे असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तो रिक्षाचालक आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून तिघांनी मिळून सुरजवर भररस्त्यात धारदार हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन-तीन वर्षांपूर्वी रिक्षात ‘पॅसेंजर भरण्यावरून’ सूरज काळे आणि आरोपींमध्ये मोठा वाद झाला होता. याच वादाचा राग आरोपींच्या मनात होता. हाच जुना राग मनात ठेवून आरोपींनी सोमवारी सूरजला गाठले आणि त्याच्यावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. आरोपी जेव्हा हा हल्ला करत होते, तेव्हा जखमी युवक पुलावरून खाली कोसळल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. यानंतर हल्लेखोर तिथून निघून गेले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)


या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ माजली होती. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने तत्काळ तपासचक्र फिरवली. पोलिसांनी वेगाने कारवाई करत या घटनेतील तिन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. बापूसाहेब बाळासाहेब भोसले (वय ३५ वर्षे), गणेश हरिभाऊ धारपाले (वय २७ वर्षे) आणि गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे (वय ३६ वर्षे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिन्ही आरोपींविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! मुलांना भेटण्यासाठी जावयाला बोलावलं अन् घेऊन गेले निर्जनस्थळी…

पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून हत्या…

पुणे शहरात युवकाची धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या…

Video: पुणे शहरात भरदिवसा युवकावर कोयत्याने सपासप वार…

धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!