पंढरपूर हादरलं! पत्नी सोशल मीडियावर जास्त असल्याच्या संशयातून हत्या; पोलिसांनी केला उलगडा…

सोलापूर : पत्नी सोशल मीडियावर जास्त असते याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून, तब्बल एक महिन्यानंतर फोटोग्राफर असणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पतीनेच पत्नीचा खून करून नग्न अवस्थेत तिचा मृतदेह टाकला होता. मृत महिलेचे नाव ऐश्वर्या हरी सरवदे (वय २९) असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील रस्त्याच्या पुलाजवळ १२ मार्च रोजी एका महिलेचे मृतदेह नग्न अवस्थेत कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता. बेवारस मृतदेहाच्या संदर्भात पोलिसांनी जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात एक हरवल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

ऐश्वर्या हरी सरवदे (वय २९) या राहत्या घरातून ९ मार्च २०२६ रोजी पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिचे पती हरी हिरालाल सरवदे (वय ३५) याने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात १२ मार्च २०२६ रोजी दिली होती. उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत डगळे यांनी या घटनेची प्राथमिक चौकशी केली असता त्यावेळी त्यांना या घटनेत थोडा संशय आला. त्यामुळे तपासासाठी पथक लावून अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. यावेळी पती कडून मिळालेल्या माहितीमध्ये विसंगती जाणवली. त्यानुसार पोलिसांनी अधिक गती देऊन तपास केला असता ऐश्वर्या यांचा खून पती हरी सरवदे याने केल्याचे पुढे आल्याचे प्रशांत डगळे यांनी सांगितले.

९ मार्च रोजी घटना घडण्याच्या दिवशी ऐश्वर्याचा मोबाईल एक तास बंद होता. या दरम्यान हरी याने ऐश्वर्याचा मोबाईल सुरू करून वॉटर पार्क येथे जात असल्याचा स्टेट्स ठेवला. हरी याने ऐश्वर्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह एक दिवस घरातच ठेवला होता. ऐश्वर्याचा मृत्यू झाला हे मुलांना समजू नये यासाठी मुलांना घराबाहेर घेऊन जात होता. एक दिवस ऐश्वर्याचा मृतदेह घरातच ठेवला. नंतर त्याने एका ठिकाणी पुरून टाकला. त्यानंतर त्याने मृतदेह पोत्यात भरून गुरसाळे (ता. पंढरपूर) येथे नेऊन टाकला. तसेच तो सतत येऊन मृतदेहाची टेहळणी करत असे. या घटनेत त्याने कोणाची मदत घेतली का याचा तपास कारणाचे काम सुरू असल्याचे प्रशांत डगळे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मृत ऐश्वर्याचा मृतदेह कुजला होता, यामुळे चेहऱ्यावरून ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र, शरीरावरील दागिने व बांधलेल्या काळा धाग्यावरून मृतदेह हा ऐश्वर्या हिचा आहे, हे ऐश्वर्या सोबत काम करणाऱ्या मैत्रिणीच्या मदतीने शोधण्यात आले. आता पती हरी सरवदे याच्यावर कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

पंढरपूरमध्ये प्रियकराने रिलस्टारला वाढदिवसाच्या दिवशीच संपवलं…

पंढरपूरमधील युवतीवरील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट…

पंढरपूर हादरलं! नगरसेवकाकडून 3 जणांवर कोयत्याने सपासप वार, कारण समोर…

पंढरपूरमध्ये प्रेमप्रकरणातून कोयत्याने हल्ला; पोलिसकाकामुळे वाचला जीव….

प्रियकर आणि प्रेयसीने ठरवून कालव्यात मारली उडी; पण खरा ट्विस्ट तर पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!