जळगाव! नवरा म्हणाला, दिपालीचा खून केला, मला अटक करा…

जळगाव: निमखेडी येथे गुढीपाडव्याच्या दिवशी पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती हा पोलीस स्टेशनला हजर झाला आणि ‘दिपालीचा खून केला, मला अटक करा’ असे सांगून शरण आला. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

दिपाली नितीन सोनवणे असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिपाली सोनवणे या पती नितीन विजय सोनवणे हे आपली दोन मुलं व एक मुलगी यांच्यासोबत निमखेडी गावात राहत होत्या. हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नितीन सोनवणे यांचे पत्नीशी काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते.

गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी पुन्हा वाद उफाळून आल्यानंतर संतापाच्या भरात त्याने लोखंडी विळ्याने पत्नीच्या मानेवर व पोटावर वार करून तिची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपी नितीन सोनवणे हा स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, नितीन विजय सोनवणे हा पत्नी, दोन मुलं व एक मुलगी आणि अंध आईसोबत निमखेडी गावात राहत होता. हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नितीन सोनवणे याचे पत्नीशी काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. नितीनला दिपालीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे मागील ४ वर्षांपासून दोघांमध्ये खटके उडत होते. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. दोघांमध्ये झटापट झाली, संतापाच्या भरात नितीनने लोखंडी विळ्याने पत्नी दिपालीच्या मानेवर आणि पोटावर वार करून तिची हत्या केली.

पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी नितीन सोनवणे हा स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी दिपाली ही घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. संशयित आरोपी नितीन याने पोलिसांना सांगितले की, मागील चार वर्षापासून त्याचे पत्नी दिपाली सोबत वाद सुरू होते. ते दोघं एकमेकापासून बऱ्याच वेळा विभक्त राहिलेले आहेत. पत्नी दिपाली ही बऱ्याचदा घरून निघून जायची. दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे आणि या वादातूनच दिपालीचा खून केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

हृदयद्रावक! चिमुकल्याला पाठीवर घेऊन आई धावत सुटली पण नको ते घडलं…

मैत्रिणीला रंग लावला म्हणून प्रियकराने मित्राला रेल्वे रुळांवर जिवंत बांधलं अन्…

नगर हादरलं! कीर्तनकार महाराजकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वारकरी संप्रदायला काळिमा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!