काळाचा घाला! पिंपरीतील मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू…

पुणे : लेह-लडाखमध्ये पर्यटनाचा आनंद घेऊन घराकडे परतणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील तीन मित्रांवर काळाने झडप घातली आहे. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात दिल्ली-मुंबई महामार्गावर बुधवारी (ता. १८) कार पुलावरून सुमारे ३० फूट खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
१. कुणाल किरण चोरडिया (वय २१, रा. चिंचवडगाव)
२. मयुरेश पांडुरंग पाडाळे (वय २१, रा. म्हाळुंगे पाडाळे, ता. मुळशी)
३. सिद्धांत रमेश आल्हाट (वय २१, रा. आल्हाट वस्ती, वाकड)

पिंपरी-चिंचवड परिसरातील मित्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तीन कारमधून लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या सहलीला गेले होते. संपूर्ण पर्यटन आटोपून ते घरी परतत असताना, कोटा जिल्ह्यातील केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत कराडिया ते बालापुरा इंटरचेंज दरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की नियंत्रण सुटलेली कार थेट पुलावरून ३० फूट खाली कोसळली. यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

प्रवासात त्यांच्यासोबत असलेल्या एका मित्राला १७ मार्च रोजी अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे तो तातडीने विमानाने घरी परतला होता. तो ज्या कारमधून प्रवास करत होता, त्याच कारचा दुसऱ्या दिवशी अपघात झाल्याची बातमी समजताच त्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन मित्रांचा अपघाती मृत्यू…

सोलापूरमध्ये दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू…

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांचा अपघाती मृत्यू…

पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…

भीषण अपघात! दोन सख्ख्या भावांसह पाच मित्रांचा जागीच मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!